विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथे मा. सुनेत्रावहीनी पवार यांच्या वाढदिवसा निमित्त “भव्य रक्तदान शिबीर संपन्न
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, बारामतीचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, वसंतराव पवार विधी महाविद्यालय व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ आक्टोबर २०२३ रोजी मा. सुनेत्रावहीनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस बिचकर, विद्याप्रतिष्ठानचे वसंतराव पवार विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल शहाणे, या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्राचार्य डॉ. आर. एस बिचकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून रक्तदानाचे महत्व व त्याची समाजासाठी असणारी गरज पटवून दिली. कोणत्याही समाज उपयोगी कार्यासाठी कोणत्याही एका विशिष्ट तारखेची किंवा दिवसाची गरज असू नये, तर येणारा प्रत्येक दिवस हा त्यांचा वाढदिवस आहे असे समजून असे उपक्रम हे सतत वारंवार घेतले जावेत. तसेच रक्तदान सारख्या या स्तुत्य उपक्रमांमध्ये जास्तीत विद्यार्थ्यांना, युवकांना सहभागी करून घ्यावे. रक्तसंकलनाच्या बाटल्यांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढता असला पाहिजे. तसेच या शिबिराचे आयोजन करणाऱ्या सर्वच आयोजक आणि विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्त्व हे माहिती असले पाहिजे. तसेच रक्ताचे वेगवेगळे गट कोणते, रक्तदान करण्यास योग्य व पात्र व्यक्ती कोणती, तसेच रक्तदान करण्यापूर्वी कोण कोणत्या रक्त तपासण्या करणे गरजेचे आहे यासारख्या प्राथमिक गोष्टीची माहिती ही आयोजकांना असलीच पाहिजे अशा पद्धतीचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. या शिबिरामध्ये विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अशा जास्ती जास्त रक्तदात्यानी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या शिबिरामध्ये एकूण २२५ रक्ताच्या बाटल्याचे संकलन करण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रा. दीपक सोनवणे, प्रा. उमेश जगदाळे, प्रा. विकास बनसोडे तसेच विद्यार्थी सुमित पवार, अभिराज निंबाळकर, चेतन काकडे, ऋतुराज काळे व महेश पाठक व त्यांचे सर्व विद्यार्थी सहकारी मित्र तसेच मुक्ताई ब्लड बँक इंदापूर यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालायचे डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. सचिन भोसले, डॉ. चित्तरंजन नायक हे सर्वजण आवर्जून उपस्थित होते. यासंपूर्ण कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.