पुणे: प्रतिनिधी: सुरेश गोसावी कुलगुरुपदी प्रा.
६ वर्षभराच्या प्रतीक्षे नंतर सावित्रीबाई फुले | पुणे विद्यापीठाच्या डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती झाली आहे. याबाबत राज्यपाल कार्यालयाने मंगळवारी दि. ६ रोजी अधिकृत घोषणा केली. कुलगुरुपदासाठी अर्ज केलेल्या २७ उमेदवारां मधून कुलगुरू शोध समितीने विद्यापीठाच्याच भौतिकशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक आणि पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. सुरेश गोसावी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे
अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, रसायनशास्त्र विभागाचे प्रा. अविनाश कुंभार, भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. संजय ढोले आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. विजय फुलारी या पाच उमेदवारांची नावे अंतिम केली होती.
२६ मे रोजी या पाचही उमेदवारांच्या मुलाखती राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी घेतल्या. त्यातून कुलगुरुपदी डॉ. गोसावी यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. गोसावी हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील आहेत, त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.एस्सी. आणि पीएच. डी. पदवी मिळवली असून, त्यांनी विविध विषयांमध्ये संशोधन पेपर सादर केले आहेत. ते प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडून शुक्रवारी दि. ९ रोजी पदभार स्वीकारतील.
गोसावी म्हणाले, “विद्यापीठाची नॅशनल इन्स्टिट्यूटशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) शैक्षणिक गुणवत्तेत झालेली पडझड सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”