संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई आयोजित
संपादक राज्य परिषदेचे संगमनेर येथे आयोजन

0
153

संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई आयोजित
संपादक राज्य परिषदेचे संगमनेर येथे आयोजन

संगमनेर (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील जिल्हास्तरीय वृत्तपत्रांच्या प्रश्‍नांसाठी तसेच विचार समन्वयासाठी रविवार दिनांक 28/5/2023 रोजी संपादक राज्य परिषदेचे आयोजन संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई या संस्थेद्वारे करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किसन भाऊ हासे यांनी दिली आहे.
या परिषदेचे उद्घाटन मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, राजहंस दुधचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, संगमनेरच्या मा. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर, नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकर सोनवणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सकाळच्या सत्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर लघु संवर्ग वृत्तपत्रांची स्थिती आणि संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारच्या सत्रात मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ संपादक केशवराव तुपे, अ‍ॅड. इलियास खान, डॉ. संतोष खेडेलेकर, योगेश पाटील, राजा कांदळकर हे सहभागी होणार आहेत. संस्थेच्या जिल्हास्तरावरील नियुक्त पदाधिकार्‍यांचा सत्कार तसेच उपस्थित संपादक-पत्रकार यांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे.
2012 साली संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुुंबई या संस्थेची स्थापना झाली. शासकीय संदेश प्रसार नियमावली 2018, पत्रकार कल्याण निधी, शासकीय जाहिरात धोरण, आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना यासारख्या अनेक मुद्यांवर गेल्या 11 वर्षांपासून संस्था काम करीत आहे.
संगमनेर येथील बीएसटी सह्याद्री महाविद्यालयाच्या सभागृहात होणार्‍या राज्य परिषदेस प्रवेश निमंत्रित व नोंदणी केलेल्या संपादकांसाठीच मर्यादित आहे. संपादक राज्य परिषद यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्र लचके, समन्वयक मनोज आगे, अरविंद गाडेकर, आनंद हासे, सुदीप हासे, संजय अहिरे, किशोर आव्हाड, रश्मी मारवाडी, मनिषा जोंधळे व सहकारी प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here