संपादक पत्रकार संघाच्या प्रदेशअध्यक्षपदी मन्सूर शेख यांनी निवड..

0
69

संपादक पत्रकार संघाच्या प्रदेशअध्यक्षपदी मन्सूर शेख यांनी निवड..

प्रतिनिधी /बारामती :- संपादक पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या नोंदणीकृत संघटनेची पदाधिकारी बैठक संपन्न झाली. यावेळी एकमताने बारामती टाईम्स चे संपादक गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत कार्य करत असलेले मन्सूर शेख यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी योगेश नालंदे, चेतन शिंदे, अजिंक्य सातकर, स्वप्निल कांबळे, गौरव अहिवळे, शुभम गायकवाड, नानासाहेब साळवे, संतोष सवाणे, सिकंदर शेख, संदीप आढाव, प्रेस फोटोग्राफर प्रशांत कुचेकर,सुरज देवकाते, निलेश जाधव, योगेश भोसले उपस्थित होते.


यावेळी बोलताना मन्सूर शेख यांनी सांगितले की, बारामती मधील पत्रकार बंधुसाठी काम करणार असून, संघटना विविध जिल्हा व तालुक्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार बंधूंवर जर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले तर पत्रकार कोणत्याही संघटनेशी बाधिल असेल तरी देखील त्यांच्या पाठीशी संपादक पत्रकार संघ ठामपणे उभे राहून पत्रकारांची बाजू मांडणार असुन पत्रकार बांधवासाठी लढा देण्यात येणार आहे. तसेच पत्रकाराच्या हितासाठी व सन्मानासाठी नेहमी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here