संत सेना नागरी सहकारी पतसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या खेळमेळीच्या वातावरणात संपन्न ७ %५० टक्के लाभांश जाहीर ….

0
33

श्री संत सेना नागरी सहकारी पतसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या खेळमेळीच्या वातावरणात संपन्न
७ %५० टक्के लाभांश जाहीर ….

बारामती: आज दिनांक ०९ सोमवार रोजी बारामतीतील डेंगळे गार्डन येथे श्री संत सेना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बारामती ची वार्षिक सर्वसाधारण सभा संत सेना पतसंस्थेचे चेअरमन महेश वारुळे यांच्या अध्यक्षतेखाली ,सचिव राजेंद्र मोरे, लेखापरीक्षक बी. एस .वाघ व सर्व संचालक,आणि सभासद यांच्या उपस्थित. संस्थेचा कारभार चौख, पारदर्शक, संस्थेच्या कारभार नफ्यात असून भरभरीटीकडे संस्था वाटचाल करत असल्याचे सांगण्यात आले. खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. संस्थेने मागच्या २०२२-२०२३ या वर्षी सभासदांना ६% लाभांश जाहीर केला होता यावर्षी ७%५० लाभांश जाहीर करण्यात आला.

श्री संतसेना नागरी सहकारी पतसंस्थेचे


सभासद : संस्थेत ३१.०३.२०२३ अखेर ९९७ सभासद होते. नविन ५६ सभासद झाले व राजीनामा ३७ सभासद झालेवर ३१.०३.२०२४ अखेर १०१६ सभासद आहेत. ठेवी: संस्थेकडे ३१.०३.२०२४ अखेर रू ७५३८४६६७.०० इतक्या ठेवी आपल्या सर्वांच्या विश्वासावर जमा आहेत. तरतुदी: संस्थेत एनपीए तरतुदी व देणे खर्चाच्या रू.३३०७९२९.०० च्या तरतुदी केलेल्या आहेत. नफाः दिनांक. ३१.०३.२०२४ अखेर व्याज तरतुदी करून निव्वळ नफा रू. १४४१२३६.०० इतका आहे. बँक शिल्लक : दिनांक ३१.०३.२०२४ अखेर बँकेत रू. २९८८६७८.२५ इतकी शिल्लक होती. बँक ठेवी : आपल्या सर्वांच्या ठेवींच्या सुरक्षेकरीता इतर बँकेमध्ये रू. ३२०२२११०.०० इतक्या ठेवींची गुंतवणुक केली आहे.
कर्जे : संस्थेच्या ५०८ सभासदांना रू.६२४०८३३३.०० इतके कर्ज वाटप केले आहे. संस्थेकडे येणे कर्जा पैकी ७२.७३% तारणी तर २७.७७% जामीनकी कर्ज आहेत.
संस्था ऑफीस : संस्थेकडे स्वमालकीचे असे संगणकीकृत ऑफीस आहे.
थकबाकी व एनपीए कर्ज गतवर्षीपेक्षा थकबाकीचे प्रमाण कमी होवून ते ३१.०३.२०२४ अखेर २६.८५% इतके आहे. तर निव्वळ एनपीए प्रमाण ४३.२७% इतके होतो त्यात मार्चनंतर बरीच कर्ज वसुल झालेने एनपीए प्रमाणात घट झाली आहे.

थकबाकीदार कारवाई काही कर्जदारांवर संस्थेला नाईलाजाने कारवाई करणे भाग पडले आहे. दि.३१.०३.२०२४ अखेर १६२ थकबाकीदार सभासदांवर रु. १९४०५०७५.०० कर्जाकरितां कारवाई केली आहे. तरी सर्व सभासदांनी आपले कर्ज वेळेत भरून सहकार्य करावे असेही सभेत बोलताना सांगितले.
सभेचे कामकाज तज्ञ संचालक किरण चौधरी यांनी वाचून दाखवले.
या सर्वसाधारण सभेत १२ विषय मांडण्यात आले . एकमताने संचालक सभासदाच्या उपस्थितीत ठराव मंजुर करण्यात आले.

यावेळी श्री संत सेना नागरी सहकारी पतसंस्थेचे चे. महेश वारुळे व्हा. चे. नवनाथ आपुणे,राजेंद्र मोरे संचालक सुरेश साळुंखे सुधाकर माने, दिलीप गारोळे सचिन माने सौ.भामा शिंदे अलका पुणे सदाशिव काशीद आकाश काळे राजू धोत्रे बापूराव कचरे, गजानन नागवणे किरण चौधरी तज्ञ संचालक प्रमोद बुलबुले तज्ञ संचालक कायदेशीर सल्लागार अँड. गिरीश देशपांडे आदी सह बारामती न.प. आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, संस्थेचे मा. संस्थापक अध्यक्ष अनिल दळवी, मा. चे. महेंद्र यादव सुनिता काळोखे लेखनिक, अल्पबचत प्रतिनिधी घनश्याम इंगुले, सौ नंदा दळवी, विठ्ठल रणवरे ,गणेश जाधव, कैलास खांडेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here