श्री .संत सेना महाराजांच्या जन्मस्थळी जाऊन ३५० नाभिक बांधवांनी केले अभिवादन

0
180

श्री. संत सेना महाराजांच्या जन्मस्थळी जाऊन ३५० नाभिक बांधवांनी केले अभिवादन

सेना महाराजांच्या जयंतीनिमित्ताने उपक्रम

गेवराई प्रतिनिधी

मध्यप्रदेश येथील उमरिया जिल्ह्यातील बांधवगड येथे श्री संत सेना महाराजांच्या जन्मस्थळी जाऊन महाराष्ट्रातील नाभिक बांधवांनी सेना महाराजांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन केले. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे विभागीय अध्यक्ष विष्णू वखरे यांच्या आवाहनानंतर राबविण्यात आलेल्या उपक्रमात राज्यातील सुमारे ३५० बांधवांनी सहभाग नोंदविला.


श्री. संत सेना महाराज हे वारकरी संप्रदायातील संत मेळ्यातील एक संत आहे. सेनाजींचा जन्म बुंदेलखंडात रेवा संस्थानची राजधानी बांधवगड येथे झाला. यंदा संत सेना महाराजांची जयंती त्यांच्या जन्मस्थळी जाऊन साजरी करण्यासंदर्भात विष्णू वखरे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून आवाहन केले होते. आवाहनास प्रतिसाद देत राज्यातील ३५० समाजबांधवांनी होकार दर्शविला. त्यानुसार १६ एप्रिलला राज्यातील विविध भागातील समाजबांधव मध्यप्रदेशातील कटनी रेल्वेस्थानकावर एकत्र आले. मध्यप्रदेशचे अखिल भारतीय सेन समाजचे प्रांताध्यक्ष दीपक सेन, शिवरतन सेन, अनिल सेन, अनुज सेन, गोविंद प्रसाद सेन, लखनजी सेन, महेंद्र सेन, प्रभू दयाळसेन, राहुल सेन, रवी सेन, श्यामसुंदर सेन, ओमप्रकाश सेन यांनी समाजबांधवांचे स्वागत केले. त्यानंतर उमरिया येथून जयंती उत्सव मिरवणुक, मशाल रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व अ.भा. सेन समाज प्रांताध्यक्ष दीपक सेन, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष दत्ता अनारसे यांनी केले. जयंतीनिमित्ताने तेथे विविध सामाजिक उपक्रम राबविल्यानंतर बांधवगड येथे श्री. संत सेना महाराजांच्या जन्मस्थळी जाऊन अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी तेथे एका चाबूतऱ्यावर असलेल्या श्री. संत सेना महाराजांच्या पुतळ्याची पुजा करण्यात आली. तेथील पुजेचा मान महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष दत्ता अनारसे, रामदास पवार, सयाजी झुंजार यांना मिळाला. महाराष्ट्रातून तेथे गेलेल्या समाज बांधवांसाठी श्री. संत सेना महाराज उत्सव समिती, अ.भा. सेन समाजच्या वतीने मोफत बस, जेवन, निवासाची व्यवस्था करण्यात आली होती.

उपक्रम यशस्वितेसाठी विष्णू वखरे, दिलीप अनर्थे, सुधाकर आहेर, सुनील पोपळे, बाबासाहेब जगताप, सयाजी झुंजार, विनोद कदम, बंडू राऊत, लक्ष्मण धाकतोडे, रवींद्र वखरे, राजकुमार गवळी, श्याम आस्करकर, प्रकाश इंगळे, राजेंद्र इंगळे, हरिभाऊ कदम, नवनाथ राऊत, कॅप्टन शंकर सूर्यवंशी, चंद्रकांत पंडित, सिध्दाजी गवळी, नारायण यादव, सुरेश सूर्यवंशी, सुरेश वैष्णव, एस. आर. सूर्यवंशी, कृष्णा शिंदे यांच्यासह नाभिक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यांनी पुढाकार घेतला.

अन् तिथे वर्षातून दोनदाच जाण्याची मुभा

बांधवगड हे ऐतिहासिक काळापासून राजघराण्याचे राखलेले जंगल आहे. सध्या व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झालेल्या या ४४८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या जंगलात वाघांशिवाय बिबटे, जंगली कुत्री, नीलगाय, चौशिंगा, भेकर, चिंकारा, रानडुक्कर, सांबर, चितळ, हनुमान लंगूर अशा अनेक प्राण्यांचे वास्तव्य तेथे आहे. अडीचशेहून अधिक जातींच्या प्राण्यांचे तेथे वास्तव्य आहे. या जंगलात हत्ती आणि जीपमधून हे प्राणी दाखविण्याची सोय आहे. परंतु, श्री. संत सेना महाराजांच्या जन्मस्थळी व तेथील चबुतराऱ्यावर बसविण्यात आलेल्या संत सेना महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन वर्षातून दोनदाच म्हणजे महाराजांच्या जयंतीदिनी आणि गोकुळ अष्टमीच्या दिवशी करता येते. हे दोन दिवस सोडून तिथे जाण्यास कोणालाही परवानगी नसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here