शेतकरीहिताच्या कामातून बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीची राज्यात आघाडी …

0
12

शेतकरीहिताच्या कामातून बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीची राज्यात आघाडी …

वार्षिक सर्वसाधारण सभेत १.६२ कोटीचा वाढावा
नवीन उपबाजार आवारात सुविधा उभारण्याचा निर्धार…

(प्रतिनिधी ) भावनगरी

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची सन २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि. २८/ स्पटेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडली. सन १९३५ पासून समितीचे कामकाज सुरू असून आजपर्यन्त मुख्य व उपबाजार आवारात शेतकरी व व्यापा-यांकरिता समितीने विविध सुविधा व उपक्रम राबविलेले आहेत. यामुळे समितीस राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. या विकास व विस्तारात स्वर्गीय अजितदादांचे मोलाचे योगदान आहे. तसेच यापूर्वीचे समितीचे माजी सभापती व संचालक मंडळाने चांगले काम केल्यामुळेच समितीचे विकासात भर पडली आहे. अहवाल सालात समितीस रु. ६.२४ कोटी उत्पन्न मिळाले असून खर्च वजा जाता रु. १.६२ कोटी एवढा वाढावा झाला आहे. यापुढे शेतकरी, व्यापारी व बाजार घटकांसाठी नवीन सुपे व झागरडवाडी येथील उपबाजार आवारात विविध सुविधा व उपक्रम राबविणार असल्याचे सभापती विनायक गावडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषिनिष्ठ शेतकरी व कृषिमित्र, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार विजेते आणि विशेष व उत्कृष्ठ काम करणारे बाजार घटकांमधुन शेतकरी, आडते, खरेदीदार, रेशीम उत्पादक शेतकरी, रिलर्स, हमाल-मापाडी तसेच समितीचे सेवक यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्याता आला.


बारामती बाजार समितीचे कामकाज राज्यात उत्कृष्ठ असल्याचे प्रमुख पाहुणे पीडीसीसी बँकेचे संचालक संभाजीनाना होळकर यांनी सांगितले. यावेळी बारामतीचे नगराध्यक्ष सचिन शेठ सातव, जि.प.सदस्य करण खलाटे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद पुणेचे माजी अध्यक्ष विश्वासनाना देवकाते, पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप बांदल, बारामती दुध संघाचे चेअरमन किशोर फडतरे व समितीचे सदस्य सुनिल पवार, विश्वास आटोळे, निलेश लडकत, रामचंद्र खलाटे, दयाराम महाडिक, युवराज देवकाते, दत्तात्रय तावरे, सतिश जगताप, बापुराव कोकरे, शुभम ठोंबरे, सौ. शोभा कदम, सौ. प्रतिभा परकाळे, मिलिंद सालपे, संतोष आटोळे, नितीन सरक, सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे, माजी सचिव अरविंद जगताप आणि बारामती मर्चन्ट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे, जळोची भाजीपाला आडतदार संघटनेचे अध्यक्ष सईद बागवान, हमाल संघटनेचे उपाध्यक्ष शंकरनाना सरक तसेच व्यापारी, शेतकरी, हमाल-मापाडी व तालुक्यातील विविध संस्थेचे पदाधिकारी, बारामती बाजार समितीचे माजी सभापती, उपसभापती व संचालक उपस्थित होते. अहवाल वाचन प्रभारी सचिव हौसेराव कोकरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार उपसभापती अरुण सकट यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्ञानेश्वर (मामा ) जगताप यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here