HomeUncategorizedशिवानी देशमुख हिची अंतराळ संशोधन संस्था ईस्त्रो मध्ये निवड

शिवानी देशमुख हिची अंतराळ संशोधन संस्था ईस्त्रो मध्ये निवड

शिवानी देशमुख हिची अंतराळ संशोधन संस्था ईस्त्रो मध्ये निवड

दोन जागांच्या मुलाखतीत एकमेव महाराष्ट्रीयन मुलीला प्राप्त सुयश हा बुलढाणा जिल्ह्याचा बहूमान!

अकोला– अंतराळ संशोधन कार्यात नेत्रदिपक कामगीरी करून आणि नुकत्याच झालेल्या चांद्रयान मोहिमेतून कुतूहलासह देशाला अभिमानास्पद यश मिळवून देणाऱ्या ईस्त्रो या संशोधन संस्थेत ज्युनिअर रिसर्च फेलो ( जे आर एफ) म्हणून कु.शिवानी राजेश देशमुख कंझारेकर हिची निवड झाली आहे.यातील दोन पदासाठी हैद्राबाद येथे झालेल्या मुलाखतीमध्ये एकमेव महाराष्ट्रीयन मुलगी म्हणून बुलढाण्याच्या खामगांव तालूक्यातील कंझारा येथील
रहिवाशी असलेल्या शिवानी हिची झालेली निवड बुलढाणा जिल्ह्यासोबतच विदर्भाला प्राप्त झालेला एक बहूमान आहे.

   शिवानी ही अमरावती येथे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात सहाय्यक अधिव्याख्याता म्हणून सेवेत कार्यरत होती.तिचे वडील राजीव उर्फ निळकंठराव हिंमतराव देशमुख हे आर्वी येथे सिव्हील कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात.ती गव्हर्नन्स सायन्स इन्स्टिट्यूट या कॉलेजमधील पर्यावरण शास्त्रातील पदविकाधारक ( एम.एस् सी.) असून तिचे दहावी,बारावी पर्यंतचे शालेय शिक्षण हे आर्वी मध्ये झाले.
     मुळातच बुध्दीने तल्लख आणि अभ्यासात हुशार असलेल्या शिवानीची पर्यावरण आणि संशोधन क्षेत्रात असलेली आवड आणि त्या जोडीला एकाग्रता आणि अभ्यासू वृत्ती जोपासण्याच्या कठोर प्रयत्नांमुळे ईस्त्रो संशोधन संस्थेत स्थानापन्न होण्याचे यश तिला प्राप्त झाले आहे. शाळा,महाविद्यालयातून शिक्षकांचे  आणि आई वडिलांचे मार्गदर्शन आणि संस्कारामुळे आपणास ईस्त्रोपर्यंत पोहचता आल्याच्या भावना शिवानी हिने व्यक्त केल्या आहेत.

     तिचे आई वडील सुद्धा कलेचे उपासक असून राजीव देशमुख हे एक उत्तम गायक व स्व‌.लता मंगेशकरांचे अनुयायी आहेत.लतादीदींवर " धरतीपर आयी सरस्वती...लता दीदी लता दीदी" हे गाणे रचून गाणारे प्रथम गीतकार गायक आहेत.लताजींना गुरूस्थानी हृदयात ठेऊन कलोपासना करतांनाच  आपल्या घरात लताजींचे मंदिर बांधून त्यात त्यांची मुर्ती विराजमान करणारे ते प्रथम उपासक आहेत.तर आई सुध्दा एक उत्तम चित्रकार आहेत.

शिवानी हिला अंतराळ संशोधन संस्थेत निवड होण्याच्या मिळालेल्या बहूमानाबध्दल तिचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या विविध क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तींना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यात सक्रिय असलेल्या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख(निंबेकर ) यांचेसह राजीव देशमुख यांच्या व शिवानीच्या असंख्य मित्र ,मैत्रीणी, आप्तस्वकीय व स्नेहीजणांनी अभिनंदन करून तिच्या वाटचालीला शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on