शाहिद क्रांतिकारकांचे स्मरण करण्यात आले. तसेच त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केला संघर्ष व बलिदान याची आठवण करून…!

0
158

विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव शहीद दिनानिमित्त “आझाद हिंदची गाथा” या नाटकाचे सादरीकरण संपन्न

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचानालय आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील एक हजारावून अधिक विद्यार्थी, कलाकार आणि नाट्यनिर्माते यांनी राज्यातील ३६ जिल्ह्यात एकाच दिवशी एकाच वेळी ७५ महाविद्यालये, ७५ ठिकाणी ७५ नाट्यप्रयोग सादर केले. विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती यांची हा नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी निवड झाली होती. येथील १७ विद्यार्थ्यांच्या गटाने क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त २३ मार्च २०२३ रोजी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात “आझाद हिंदची गाथा” हा नाट्यप्रयोग सादर केला. या नाट्य प्रयोगाच्या निमित्ताने या शाहिद क्रांतिकारकांचे स्मरण करण्यात आले. तसेच त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केला संघर्ष व बलिदान याची आठवण करून देण्यात आली.

हा नाट्य प्रयोग पाहण्यासाठी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, विद्यार्थी कल्याण कक्ष अधिकारी प्रा. हनुमंत बोराटे तसेच सास्कृंतिक अधिकारी प्रा. पल्लवी बोके, नाट्य विभाग प्रमुख प्रा. केशव भागवत, प्रसारमाध्यम विभागाचे समन्वयक सुनिल भोसले, तसेच अनेक विद्यार्थी उपस्थितीत होते. ३६ जिल्ह्यातील ७५ महाविद्यालयांमध्ये या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची हा नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी निवड झाली यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रा. स. बिचकर विद्यार्थी कल्याण कक्ष अधिकारी प्रा. हनुमंत बोराटे तसेच सास्कृंतिक अधिकारी प्रा. पल्लवी बोके, नाट्य विभाग प्रमुख प्रा. केशव भागवत यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सचिव ॲड. निलीमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्थ डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्टार कर्नल श्रीश कंभोज या सर्वानी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले व त्याच्या पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here