शारदानगर येथील बुद्धिबळ स्पर्धेत विविध शाळांमधील ११४ खेळाडूंचा सहभाग

0
22
शारदानगर येथील बुद्धिबळ स्पर्धेत विविध शाळांमधील ११४ खेळाडूंचा सहभाग

शारदानगर येथील बुद्धिबळ स्पर्धेत विविध शाळांमधील ११४ खेळाडूंचा सहभाग

बारामती दि. १७ : क्रीडा विभाग व शारदाबाई पवार विद्यानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर येथे तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बारामती तालुक्यातील विविध शाळांमधील ११४ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

स्पर्धेचे उद्घाटन विद्यानिकेतनचे प्राचार्य झंजने यांनी केले. कार्यक्रमास तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव, क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खोमणे, उपाध्यक्ष संजय होळकर, सचिव अशोक देवकर मेटकरी, क्रीडा शिक्षक व क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी झालेले स्पर्धक, शाळांची नावे पुढीलप्रमाणे- १४ वर्ष वयोगट डहाळे विरन, कारभारी आण्णा चॅरिटेबल फाऊंडेशन हायस्कुल बारामती, कुतवळ अनुस्का, शहाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुपे १७ वर्ष वयोगट कुतवळ ईशान, शहाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुपे, मंडले समीक्षा, आर. एन अग्रवाल टेक्निकल हायस्कूल बारामती १९ वर्ष वयोगट साळंबे पार्थ, सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोमेश्वर व प्राजक्ता जाधव, शारदाबाई पवार विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज माळेगाव.

महाविद्यालयाचे योगेश ढबळे, सचिन नाळे, श्री. रणवरे, श्री. झणझणे, एस.पी. होळकर यांनी पंच म्हणून काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here