शशिकला गावडे राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्काराने सन्मानित
ईगल फाउंडेशन यांच्यावतीने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
सांगली / प्रतिनिधी
आरग तालुका मिरज जिल्हा सांगली येथील झलकारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष शशिकला गावडे यांना रत्नागिरी येथील ईगल फाउंडेशनच्या वतीने समाजगौरव पुरस्कार२०२४ ने सन्मानित करण्यात आले.
शशिकला गावडे या झलकारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आरग च्या संस्थापक अध्यक्ष असून येथील महिलांना एकत्र करून महिलांच्या उन्नतीसाठी संस्थेची स्थापना केली आहे. संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. संस्थेच्या वतीने आरग तालुका मिरज येथील जिल्हा परिषद शाळा नंबर १मधील विद्यार्थ्यांच्या अंकुर या कविता संग्रहाचे प्रकाशन प्रकाशिका,सांगलीवार्ताच्या शिवजयंती विशेषांक, माहिती तंत्रज्ञान विशेषांक ,शाहू-फुले-आंबेडकर -शपा विशेषांक इत्यादी विशेषांकाचे संपादन,साहित्य, संस्कृतिक व सामाजिक कार्यात सहभाग,वर्ल्ड व्हिजन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांत सहभाग घेतला,आर्थिक दुर्बल घटकातील स्त्रियांना उद्योग व्यवसायाकरिता आर्थिक मदत व संसार उपयोगी वस्तूही मिळवून दिल्या,आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फि करता संस्थेकडे शिफारशी करून अर्थसहाय्य मिळवून दिले, ग्रामीण भागातील अंगणवाड्यांतील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व खेळणी उपलब्ध करून दिली.
पाणी फाउंडेशन साठी नाबार्ड योजने अंतर्गत २०१७ मिरज येथील१५, कवठेमंकाळ येथील १४ गावात, अशा एकूण २९ गावात पाणी आडवा पाणी जिरवा चा संदेश देत पाण्यासंबंधी जनजागृती मोहीम राबवली . यात सक्रीय सहभाग होता.जिल्हा उद्योग भवन यांच्यावतीने आर. एस .सी. ई .टी. वतीने १९ गावातील महिलांना उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण दिले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांची स्थापना करून शासनाच्या वतीने महिला स्वयंसहायता समूहांना दिले जाणारे निधी व अन्य सर्व योजना सक्रिय सहभाग असतो. सध्या त्या बँक सखी या पदावर कार्यरत आहेत. महिला दिन, शिवजयंती , सावित्रीमाई फुले जयंती, जिजाऊ जयंती ,जगद्गुरू तुकोबाराय जयंती यासारख्या समाज उपक्रमांत संस्था व वयक्तीक सक्रिया सहभागाची दखल घेऊन ईगल फाउंडेशन यांच्या वतीने त्यांना समाजगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
संजय घोडावत कॉलेजच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी ईगल फाउंडेशनचे अध्यक्ष विलास कोळेकर,माजी खा.निवेदिता माने, उद्योजक एन.सी.संघवी,डॉ.शंकर अंदानी,प्रविण काकडे, डॉ.डी.वाय पाटील शिक्षण समुहाचे विश्वस्त सुर्यकांत तोडकर,उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, हातकणंगलेचे तहसिलदार सुशिल बेलेकर. सागर पाटील,प्रा.प्रकाश वंजोळे, शेखर सुर्यवंशी, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व केंद्रप्रमुख हरिभाऊ गावडे, साहित्यिक चंद्रकांत बाबर, झलकारी संस्थेच्या सचिव अधिका बाबर, डॉ मोहन लोंढे, पत्रकार शिवराज काटकर, रवी हजारे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.