वृक्ष संवर्धन ही काळाची गरज – महंत रामगिरीजी महाराजतसेच दीक्षाभूमी ते मंत्रालय संवाद यात्रा यशस्वी केल्याबद्दल डॉ विश्वासराव आरोटे यांचा सरला बेट चे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सन्मान..आरोटे.. यांचे कार्य कौतुकास्पद –

0
13

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज – महंत रामगिरीजी महाराज
तसेच दीक्षाभूमी ते मंत्रालय संवाद यात्रा यशस्वी केल्याबद्दल डॉ विश्वासराव आरोटे यांचा सरला बेट चे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सन्मान..आरोटे.. यांचे कार्य कौतुकास्पद –

श्रीरामपुर [ प्रतिनीधी ] श्रीरामपुर तालुक्यातील श्री क्षेत्र सराला बेट या ठिकाणी
महाराष्ट्र राज्यपत्रकार संघ डॉ विश्वासराव आरोटे यांचे मार्गदर्शनाखाली वृक्ष संवर्धन संदेश व लक्ष्मीतरू या वृंक्षाचे १ हजार सिड बॉल व वृक्ष वितरण करण्यात आले
प्रसंगी डॉ विश्वासराव आरोटे श्री संदिप कसार सर यांनी महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचा सन्मान केला… तर दीक्षाभूमी ते मंत्रालय ही सहा हजार किलोमीटर संवाद यात्रेमध्ये पत्रकारांचे प्रश्न घेऊन केंद्र सरकार व राज्य सरकारकडे मागणी करत ही यात्रा यशस्वी केल्याबद्दल यावेळी सरला बेट चे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते डॉक्टर विश्वासराव आरोटे यांचा शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन रामगिरी महाराज यांनी सत्कार केला तर केंद्र व राज्य सरकार नक्कीच पत्रकारांचे प्रश्न मार्गी लागेल असा मला आशावाद आहे यावेळी सांगितले.. याप्रसंगी वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून लक्ष्मी तरुचे वृक्ष १००% ऑक्सिजन देणारी वनस्पती असल्याने करोणा महामारी आजाराच्या कालावधीत सदर वृक्षांचा देशात तसेच राज्यात मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला तसेच वृक्ष लागवड ज्या ठिकाणी जास्त प्रमाणावर आहे अक्षा ठिकाणी पर्जन्यमान अधिक असल्याचे आढळून आल्याचे महंत रामगिरीजी महाराज यांनी सांगितले तसेच पत्रकार संघटनेचे डॉ विश्वासराव आरोटे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन करत श्री श्री रविशंकर शाळेचा उपक्रम अभिमानास्पद असल्याने त्यांनाही धन्यवाद व्यक्त केले
लक्ष्मी तरू वृक्षांचे अनन्य साधारण महत्व असल्याने श्री क्षेत्र सराला बेट गोदाधाम महंत रामगिरीजी महाराज यांचे शुभहस्ते अभियानाचा शुभारंभ करण्यात आला


श्री श्री रविशंकर विदया मंदिर संस्थेचे अध्यक्ष संदिप कसार यांच्या संकल्पनेतुन शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षाचे शिडबॉल तयार करून घर तेथे लक्ष्मी तरुचे वृक्ष असा उपक्रम राबविण्यात येत आहे . सध्या अहमदनगर जिल्हा स्तरावर लवकरच पत्रकार बांधव यांना लक्ष्मीतरू वृक्ष भेट देणार आहे यासाठी वडाळा महादेव येथील श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळा तसेच श्रीरामपुर तालुका पत्रकार संघ प्रयत्नशील आहेत
प्रसंगी डॉ विश्वासराव आरोटे साहेब विश्वस्त सराला बेट मधुकर महाराज कडलग
श्री श्री रविशंकर विदया मंदिर शाळा अध्यक्ष संदिप कसार निवड समिती अध्यक्ष चंद्रकांत झुंरगे .श्रीरामपुर तालुका अध्यक्ष राजेन्द्र देसाई . शहर अध्यक्ष अमोल कदम श्री फुलसौदर सचिव गौरव शेटे . पद्मनाथ वाघमारे आदि पत्रकार प्रयत्नशील होते सदरचा उपक्रम राज्यभर राबविणार असल्याचे डॉ आरोटे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र देसाई यांनी केले तर अध्यक्ष संदिप कसार यांनी आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here