विभागस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत बारामतीच्या मोहम्मदअली शेखला सुवर्णपदक; दमदार कामगिरीने मारली बाजी!

0
2

विभागस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत बारामतीच्या मोहम्मदअली शेखला सुवर्णपदक; दमदार कामगिरीने मारली बाजी!

बारामती : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत आणि सकाळ माध्यम समूह आयोजित ‘सकाळ स्कूल ऑलिंपिक्स’ विभागस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत बारामतीच्या मोहम्मदअली शहानुर शेख याने शानदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. १४ वर्षांखालील मुलांच्या ३० ते ३२ किलो वजनगटात त्याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करून अव्वल स्थान पटकावले. त्याच्या या यशामुळे बारामतीच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, पुणे तसेच पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना आणि पुणे शहर बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा, शहर व विभागस्तरीय आंतरशालेय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील भवानीपेठ येथील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियममध्ये या स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.


मोहम्मदअली हा बारामती येथील नॉकआऊट बॉक्सिंग ॲकॅडमीचा विद्यार्थी आहे. नियमित सराव, प्रचंड मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने ही उल्लेखनीय कामगिरी केली. रिंगमध्ये उतरल्यापासूनच त्याने आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. अचूकता, वेग आणि ताकदीचा सुरेख मेळ साधत त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूला बचावाची संधी न देता विजय मिळवला.
मोहम्मदअलीच्या या यशामागे त्याची मेहनत आणि नॉकआऊट बॉक्सिंग ॲकॅडमीचे मार्गदर्शक अमर भंडलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
त्याच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, मोहम्मदअलीच्या सुवर्ण कामगिरीमुळे बारामतीच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे.

Previous articleराज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here