विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष विभागाने २५ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतीय चाली रिती, रूढी परंपरेचे ज्ञान व प्रकल्प प्रदर्शन

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष विभागाने २५ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतीय चाली रिती, रूढी परंपरेचे ज्ञान व प्रकल्प प्रदर्शन

0
156

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष विभागामार्फत भारतीय चाली रिती, रूढी परंपरेचे ज्ञान व प्रकल्प प्रदर्शन या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष विभागाने २५ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतीय चाली रिती, रूढी परंपरेचे ज्ञान व प्रकल्प प्रदर्शन हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर तसेच प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखेच्या विभाग प्रमुख डॉ. अपर्णा सज्जन, डॉ. अनिल हिवरेकर, डॉ. अनिल दिसले, प्रा. दीपक सोनवणे, डॉ. अनिल पाटील, प्रा. गौरी भोईटे, प्रा. वर्षा सुरवसे, प्रा. ज्योती कुलकर्णी तसेच अन्य प्राध्यापकांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयातील उपस्थित असणाऱ्या प्राध्यापकांना टीळा लावून टोपी घालण्यात आली व महिला प्राध्यापकांची ओटी भरून हळदीकुंकू लावून विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमांमध्ये भारतीय संस्कृती, संरचना, तंत्रज्ञान, लोककला यासारख्या भूतपूर्व साहित्याचा समावेश करण्यात आला होता.
कार्यक्रमांमध्ये प्रथमतः विद्यार्थिनी संस्कृतीने गणेश वंदनाने व कथक नृत्याने या कार्यक्रमाची यशस्वी सुरुवात केली. विद्यार्थिनी कु. क्षितिजा आणि ऋतुजा यांनी अथर्वशीर्ष पठण केले. विद्यार्थी कु. ओंकार यांनी वासुदेवाचा वेश परिधान करून वासुदेवाचे गीत गायन केले. कु. क्षितिजा आणि कु. प्रांजली यांनी श्रीहरी स्तोत्राचे पठण केले. त्यानंतर विद्यार्थी कु. ऋतुराज याने ऋषींची भूमिका केली. कु. श्रीनिवास यांनी ऋषींची तर विद्यार्थिनी कु. ऋतुजा आणि कु. क्षितिजा यांनी ऋषीकांची माहिती दिली. कु. सायली या विद्यार्थिनीने अग्नी सूक्त आणि अग्निहोत्र याच्याबद्दल तर विद्यार्थिनी कु. तृप्ती मोरे हिने श्रीयंत्र आणि कुंकुम अर्चना याच्याबद्दल माहिती दिली. भारतीय संस्कृतीमध्ये आहाराला, अन्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणूनच विद्यार्थिनी नुपूर हिने अन्नपूर्णा माते विषयी तर विद्यार्थिनी कु. अंकिता हिने लोपामुद्रा याविषयीची माहिती दिली. तसेच प्रियंका हिने अरुंधतीची भूमिका साकारली. विद्यार्थी अनिकेत याने थोर गणित तज्ञ रामानुजन यांच्या बद्दलची माहिती सांगितली. तसेच कु. आदित्य या विद्यार्थ्यांनी धनुर्विद्याशास्त्र तसेच वारकरी परंपरेची माहिती विद्यार्थिनी कु. वैष्णवी हिने वारकरी वेश परिधान करून सर्वांसमोर सादर दिली. तसेच या कार्यक्रमामध्ये टीळा, रांगोळी, कलश यांचे भारतीय संस्कृतीत असणारे महत्व विद्यार्थ्यांनी उपस्थितांना पटवून दिले. या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. भारतीय संस्कृतीचे अत्यंत चांगले दर्शन या प्रदर्शनामध्ये घडले. विद्यार्थ्यांनी प्राचीन काळापासून आयुर्वेदात उपयुक्त असणारे वेगवेगळे वृक्ष, प्राचीन काळापासून चालत आलेले सागरी मार्ग, प्राचीन वास्तुशास्त्र, मुद्राशास्त्र, नाडीशास्त्र, बारा राशी, अठ्ठावीस नक्षत्र त्याचप्रमाणे धनुर्विद्याशास्त्र तसेच योगा, प्राचीनकाळातील विद्यापीठे, प्राचीन शल्यचिकित्सा शास्त्र या सर्वांची भित्तिपत्रके तयार करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांना त्याची योग्य माहिती दिली. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा आपल्या विद्यार्थ्यांना भारतीय परंपरेचा अभ्यास व्हावा तसेच भारतीय परंपरा आणि आपले आयुर्वेदिक शास्त्र, योगशास्त्र किंवा वास्तुशास्त्र तसेच सांस्कृतिक परंपरा, तसेच गुरु शिष्य परंपरा व गुरुकुल पद्धती ही आपल्या देशाला मिळालेली देणगी आहे यांची नवीन पिढीला माहिती व्हावी आणि त्यातून ते ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहचावे या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता.
या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, डॉ. अपर्णा सज्जन डॉ. अनिल हिवरेकर, प्रा. दीपक सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ. निर्मल साहुजी यांनी भारतीय जुन्या रूढी परंपरा आणि भारतीय विज्ञान यांची सांगड घालताना अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या दोन्हींचा योग्य तो समन्वय साधून हे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले पाहिजे अशा पद्धतीचे मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमांमध्ये अग्निहोत्र पेटविण्यात आलं होतं त्यामुळे अत्यंत भक्तीमय आणि आनंदी वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. कल्याणी कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरमने करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here