विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबीर यशस्वी संपन्न

0
120

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबीर यशस्वी संपन्न
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मतदार जागरुकता क्लब, विद्यार्थी कल्याण कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सयुक्त विद्यमाने व निवडणूक शाखा तहसिल कार्यालय बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली २० सप्टेंबर २०२३ रोजी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये मतदार नोंदणी शिबीर घेण्यात आले. बारामती तहसिल निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, सचिन निकम, प्रदीप भागवत हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थितीत होते. सुरुवातीला विद्यार्थिनी मुस्कान पठाण हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मान्यवरांचा सत्कार प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात लोकशाही म्हणजे काय, मतदान करणे हे किती महत्वाचे आहे या विषयावर चर्चा केली. तसेच तुषार गुंजवटे हे अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी थोडक्यात माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून चांगला ग्रेड पॉईंट आणावा असा सल्ला दिला.
श्री. सचिन निकम यांनी निवडणूक मतदार नाव नोंदणी प्रक्रिया कशी असते हे त्यांनी प्रोजेक्टर व स्लाईडशोच्या माध्यमातून माहितीचे सादरीकरण करून नवीन मतदार नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि ऑनलाईन पद्धतीने नवीन मतदार नोंदणी करण्यात आली. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कुटुंबातील मतदार व्यक्तीचे मतदार नोंदणी करून निवडणूक शाखेला सहकार्य करावे असे सर्व उपस्थितांना आव्हान केले. या शिबिरासाठी १७० विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, डॉ. अनिल पाटील, डॉ. अनिल डिसले, प्रा. दीपक सोनवणे, प्रा. प्रवीण धांडोरे हे उपस्थित होते. आभार प्रदर्शन डॉ. अनिल पाटील यांनी केले व त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here