प्रतिनिधी : विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे विद्युत सुरक्षा प्रशिक्षण शिबीर संपन्न
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे महाविद्यालयाची विद्युत अभियांत्रिकी शाखा व महाराष्ट्र शासन विद्युत निरीक्षक पुणे उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जून २०२३ रोजी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये विद्युत सुरक्षा प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
‘विद्युत सुरक्षितता सर्वोच्च प्राथमिकता’ हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागामार्फत राज्यभर विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आपण आपल्या घरी, कार्यालयात, शेतात हमखासपणे वीज वापरतो. तसेच विद्युत उपकरणे आणि बिघाड झाली असेल तर वेळोवेळी वायरींगही बदलून घेतो. अशा वेळी काही महत्वाच्या बाबी आणि सूचनांचे पालन केले पाहिजे.
तर निश्चितच सुरक्षिततेचा उपाय होऊ शकतो. कटु प्रसंग झाल्यास प्राण हानी टळू शकते. विद्युत सुरक्षा सप्ताहात मुख्यत्वे विद्युत संचमांडणी सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे, काय करू नये, विद्युत उपकरणे कशी हाताळावीत, उद्वाहनांचा सुरक्षित वापर करण्याबद्दलचे निकष, सुरक्षेच्या बाबी लक्षात घेऊन बनवले गेलेले नियम, गुणवत्ता, प्रशिक्षण, नियम न पाळल्यास होऊ शकणारी कारवाई अशा अनेक मुद्यांवर प्रकाशझोत टाकण्याचे महत्त्वाचे काम केले.
सुरक्षित उपाय योजना म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात इ. एल. सी. बी. / एम. सी. बी. चा वापर करावा. तसेच प्रत्येकाने घरातील विद्युत पुरवठ्याचे काम हे कुशल कर्मचाऱ्यांमार्फत करून घ्यावे. तसेच आयएसओ मानांकित उपकरणे व विद्युत साहित्याचा वापर करण्याचा आग्रह धरावा असा मोलाचा सल्ला देऊन मार्गदर्शन केले. तसेच श्री. गावडे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले.