विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे “वोल्ट्झफेस्ट २०२५” कार्यक्रम जल्लोषात साजरा
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथील विद्युत अभियांत्रिकी विभाग आणि इलिसा (ELISA) संघटनेच्या संयुक्त विद्यमाने “वोल्ट्झफेस्ट २०२५” या तांत्रिक महोत्सवाचे आयोजन दि. १० व ११ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून विजयकुमार कुलकर्णी (कार्यकारी अभियंता, शिर्सुफळ सौरऊर्जा विभाग), ज्ञानेश्वर कुंभार (संचालक, सनस्पार्क सोलार) तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे उपस्थित होते.
स्पर्धा आणि उपक्रम:
“वोल्ट्झफेस्ट २०२५” मध्ये विद्युत अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विविध स्पर्धा आणि तांत्रिक सादरीकरणे आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रमुख स्पर्धांमध्ये खालील प्रकार समाविष्ट होते:
१. तांत्रिक स्पर्धा:
टेक रंबल – आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रश्नमंजूषा.
माइंड मॅरेथॉन – विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांची चाचणी घेणारी स्पर्धा.
रेस एक्स चॅलेंज – रोबोटिक्स आणि स्वयंचलित वाहने यावर आधारित स्पर्धा.
ऑक्शन अरेना – कल्पकतेला चालना देणारी स्टार्टअप संकल्पना सादरीकरण स्पर्धा.
एआय-आर्ट गॅलरी – कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने डिजिटल आर्ट तयार करण्याची संधी.
गेम्स – सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यावर आधारित गेम डेव्हलपमेंट स्पर्धा.
सर्किट बिल्डिंग – इलेक्ट्रॉनिक्स आणि सर्किट डिझाइनवर आधारित स्पर्धा.
रीलफेस्ट – तांत्रिक माहितीपट आणि लघुपट स्पर्धा.
स्केच शोडाऊन – कॅड – ऑटोकॅड व इतर डिझाइन सॉफ्टवेअरवर आधारित स्पर्धा.
२. शालेय स्तरावरील स्पर्धा:
प्रश्नमंजूषा स्पर्धा
पोस्टर प्रेझेंटेशन – शाश्वत विकास ध्येये (Sustainable Development Goals) यावर आधारित.
३. तांत्रिक शो:
ड्रोन शो – ड्रोन टेक्नॉलॉजीचे विविध अनुप्रयोग सादर करणारा विशेष कार्यक्रम.
ईव्ही शो – इलेक्ट्रिक वाहनांवरील नव्या संशोधनाची झलक.
सोलर शो – सौरऊर्जेवरील आधुनिक संशोधन आणि प्रकल्पांचे सादरीकरण.
तांत्रिक मॉडेल्स आणि सादरीकरणे:
या महोत्सवात विद्यार्थ्यांनी स्वतः विकसित केलेल्या विविध तांत्रिक प्रकल्पांचे सादरीकरण केले, ज्यामध्ये प्रामुख्याने ड्रोन, हायड्रोलिक पावर प्लॅन्ट, पॉवर सब स्टेशन, सोलर पावर प्लॅन्ट, न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट, थर्मल पावर प्लॅन्ट यांसारख्या महत्त्वाच्या तंत्रज्ञानाची प्रतिकृती तयार करण्यात आली.
शालेय स्तरावरील भित्तिपत्रक प्रदर्शन:
विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक आणि वैज्ञानिक विषयांवर आधारित भित्तिपत्रके तयार केली, ज्यामध्ये स्वच्छ भारत अभियान, पाणी म्हणजे जीवन, स्वच्छ भारत हरित भारत, ऊर्जेची बचत, आवाज व प्लास्टिक प्रदूषण, सौर ऊर्जा, स्त्रीशक्ती, जागतिक मानसिक आरोग्य, भारतीय सैन्यदल यांसारख्या विषयांवर प्रकाश टाकण्यात आला.
प्रायोजक आणि मान्यवरांचे योगदान:
या कार्यक्रमाला ११ उद्योगांनी आर्थिक आणि तांत्रिक प्रायोजकत्व दिले, ज्यामध्ये जगदंबा डेव्हलपर्स, स्नेहा इंटरप्रायझेस, पद्मावती डायनिंग हॉल, अमेया इंडस्ट्रीज, सन पार्क सोलार, लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन बारामती, प्रवीण कॉस्मेटिक, शिवन्न्या सेल्स प्रा. लिमिटेड, बिलिव्ह इव्ही स्टोअर, ब्लॅकएक्स सलून, बिट इलेक्ट्रॉनिक सिस्टिम यांचा समावेश होता.
बक्षीस वितरण समारंभ:
स्पर्धेत विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विजय सूर्यवंशी (कार्यकारी अभियंता, चाचणी विभाग, महावितरण, बारामती) तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर लांडे, प्रा. पूजा जैस्वाल, प्रा. वैशाली देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यामागील महत्त्वाचे योगदान:
या कार्यक्रमाचे आयोजन आणि यशस्वी पार पडण्यासाठी विद्युत अभियांत्रिकी विभागाचे शिक्षक आणि विद्यार्थी यांचे मोठे योगदान होते. प्रमुख आयोजक आणि मार्गदर्शक प्राध्यापकांमध्ये प्रा. रोहित तरडे, प्रा. श्रीमंती रोकडे, प्रा. पवन उपाध्ये, प्रा. दीपक येवले, प्रा. ज्योती कुलकर्णी, प्रा. हाफिज शेख, प्रा. संदीप शेलार, प्रा. शिवाजी रासकर, प्रा. अजिंक्य गोलांडे, प्रा. अक्षय आखाडे यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि संघभावना विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित “वोल्ट्झफेस्ट २०२५” हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रा. वैशाली देवकाते यांनी आभार प्रदर्शन केले आणि भविष्यातील अशा उपक्रमांसाठी सर्वांना प्रेरित केले.
“वोल्ट्झफेस्ट २०२५” हा केवळ एक तांत्रिक महोत्सव नसून, विद्यार्थ्यांना आपल्या प्रतिभा आणि कौशल्यांना वाव देणारा एक महत्त्वपूर्ण मंच ठरला!