विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथे Elysium २०२४ हा कार्यक्रम उत्सहात संपन्न

0
14

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथे Elysium २०२४ हा कार्यक्रम उत्सहात संपन्न
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथे Elysium २०२४ हा कार्यक्रम महाविद्यालयातील यांत्रिक अभियांत्रिकी शाखेने २३ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आयोजित केला होता. हा उपक्रम अत्यंत नाविन्यपूर्ण व प्रतिभासंपन्न आणि आगळावेगळा असा होता. या कार्यक्रमामधून विद्यार्थी आणि शिक्षक यांनी एकत्र येऊन सर्जनशीलता, तांत्रिक कौशल्य आणि टीमवर्क याचा एक अनोखा संगम सर्वाना पाहिला मिळाला. या कार्यक्रमात विविध विषयांतील स्पर्धकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धा आणि विविध उपक्रम यांची अत्यंत शिस्तबद्ध आखणी केली होती. Elysium २०२४ च्या या उपक्रमात प्रामुख्याने टेक हॅकाथॉन, क्विझ ऑलिम्पियाड, रोबो रेस चॅलेंज, शार्क टँक स्टार्टअप आणि वादविवाद स्पर्धा यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच खजिन्याची शोधाशोध (ट्रेझर हंट) आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी सहभागींना त्यांची धोरणात्मक विचारसरणी आणि कलात्मक प्रतिभा प्रदर्शित करण्याची संधी दिली गेली. फोटोग्राफी आणि क्लॅश ऑफ सीएडी सारख्या अतिरिक्त कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्ये अधोरेखित केली गेली. तसेच या कार्यक्रमात उत्तमकामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख डॉ. मनीषा लांडे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. Elysium २०२४ या उपक्रमामुळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी नाविन्यपूर्ण आणि सहयोगाची भावना तयार झाली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर त्यांचा सर्वांगीणविकास घडविण्यासाठी हे महाविद्यालय नेहमीच असे उपक्रम रावबवीत असते असे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केलं. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता बारामती येथील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणारी आचार्य अकादमी आणि वस्त्रउद्योगात अग्रेसर असलेले बारामती कलेक्शन यांनी केलेले आर्थिक सहकार्य तसेच उपक्रमात सहभागी झालेले संघ, तसेच या कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक प्रा. हनुमंत बोराटे, महाविद्यालयातील यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, सहभागी विद्यार्थी या सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पारपडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here