वाहतुकीवरील ताण कमी होण्यास होणार मदत.. : जय पाटील
बारामती शहरातील महत्वकांक्षी : रस्त्यांच्या कामाला अखेर सुरवात…
बारामती (दि:२३)
बारामती शहरातील महत्वकांक्षी असणाऱ्या रस्त्यांच्या कामाला अखेर सुरवात झाली आहे.सातव चाैक ते पाटस रस्ता आणि अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते शासकीय आयुर्वेद महाविद्यालय मेडद या दोन्ही रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे.त्यामुळे बारामती शहरातील अंतर्गत वाहतुक विशेषत: भिगवण रस्त्यावर येणारा वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
याबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी अधिक माहिती दिली.
पाटील यांनी सांगितले कि,बारामती शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासनाकडुन कोट्यावधींचा निधी आणला आहे.त्यामुळे शहराचा कायापालट होत आहे. शहरातील पाणीपुरवठ्यासह महत्वाचे प्रश्न मार्गी लागत आहेत. शहरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे.याअंतर्गत उपमुख्यमंत्री पवार यांच्या संकल्पनेतूनच सातव चाैक ते पाटस रस्ता आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते शासकीय आयुर्वेद महाविद्यालय मेडद या दोन्ही रस्त्यांच्या कामास सुरवात झाली आहे. सातव चाैक ते पाटस रस्ता हा चारपदरी आहे.यामध्ये सातव चाैकात मोठे सर्कल निर्मिती करण्यात येणार आहे.हा संपुर्ण रस्ता चार पदरी असून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लागवण्यात येणार आहे.शिवाय रस्त्याच्या दुभाजका मध्ये देखील शोभेची झाडे लावण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले. हि झाडे लागवड आणि देखभालीसाठी आपण स्वत: दत्तक घेणार असल्याचे पाटील म्हणाले.
तांदुळवाडी रस्त्यालगत आर. एन.आगरवाल टेक्कनीकल हायस्कुल,तसेच अनेकान्त इंग्लीश मिडीयम शाळा आहे.तसेच भिगवण रस्ता,पाटस रस्त्यावरील,एमआयडीसीकडे जाणारी वाहने ओव्हरब्रिज वरुन जाण्यासाठी याच चाैकात येतात.परीणामी या मार्गावर मोठी गर्दी होते.वाहनांची कोंडी होते.त्यासाठी सातव चाैक ते पाटस रस्ता महत्वाचा ठरणार आहे.हा रस्ता ८० फुटी आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्ट्राॅम वाॅटर लाइन टाकण्यात येणार आहे.त्याचे काम सुरु आहे.येत्या सहा महिन्यात हे काम पुर्ण होइल.याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी वेळेत काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते शासकीय आयुर्वेद महाविद्यालय मेडद या रस्त्यामुळे दोन्ही वैद्यकीय महाविद्यालय जोडली जाणार आहेत.मोरगांव,तसेच पाटस मार्गावरील एमआयडीसीत जाणारी वाहतुक या मार्गाने वळविण्यास सोपे होणार आहे.त्यामुळे बारामती शहरातील वाहतुक भविष्यात अत्यंत सुटसुटीत होणार असल्याचे पाटील म्हणाले.
सातव चाैक ते पाटस रस्ता काम सुरु झाले आहे.त्यासाठी रस्त्यालगतच्या नागरीकांनी स्वत:हुन रस्त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करण्याासाठी कंपाउंड,घरे ,शेड काढुन घेतली आहेत.त्यांच्यामुळे रस्त्याचे काम वेळेत आणि वेगाने पुर्ण होणार आहे.या नागरीकांची मदत रस्त्यासाठी मोलाची ठरली.तसेच ज्यांनी त्यांची जमीन उपलब्ध केलेली नाही,त्यांनी ती उपलब्ध करावी.शहरासाठी आपली भुमिका मोलाची असल्याचे जय पाटील म्हणाले
सातव चाैक ते पाटस रस्ता काम सुरु झाले आहे.त्यासाठी रस्त्यालगतच्या नागरीकांनी स्वत:हुन रस्त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करण्याासाठी कंपाउंड,घरे ,शेड काढुन घेतली आहेत.त्यांच्यामुळे रस्त्याचे काम वेळेत आणि वेगाने पुर्ण होणार आहे.या नागरीकांची मदत रस्त्यासाठी मोलाची ठरली.तसेच ज्यांनी त्यांची जमीन उपलब्ध केलेली नाही,त्यांनी ती उपलब्ध करावी.शहरासाठी आपली भुमिका मोलाची आहे,अशी आपली संबंधितांना विनंती आहे …