HomeUncategorizedलहान मोठा भेदभाव न ठेवता पत्रकारांनी आपल्या मागण्यांसाठी संघटीत शक्तीचा चमत्कार दाखविला...

लहान मोठा भेदभाव न ठेवता पत्रकारांनी आपल्या मागण्यांसाठी संघटीत शक्तीचा चमत्कार दाखविला पाहिजे…संजय एम.देशमुख

लहान मोठा भेदभाव न ठेवता पत्रकारांनी आपल्या मागण्यांसाठी संघटीत शक्तीचा चमत्कार दाखविला पाहिजे…संजय एम.देशमुख

“गावाकडील बातमी” या महाराष्ट्रातील सुपरिचित न्यूज पोर्टलच्या आष्टी कार्यालयाचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून उद्घाटन

गुरूकुंज आश्रमात राष्ट्रसंत या सामाजिक अधिष्ठानाला वंदन

पुलगाव – पत्रकारांनी लहान मोठा असा भेदभाव न ठेवता शासनाकडे अन्याविरूध्द दाद मागण्यासाठी आणि हक्कप्राप्तीसाठी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना सांभाळत संघटीत शक्तीच्या प्रभावाचा चमत्कार दाखविला पाहिजे,तरच पत्रकारितेतून खऱ्या लोकशाहीचे संवर्धन होण्यास मोलाची मदत होईल. पत्रकारांमधील फाटाफुटीच्या फटांचा गैरफायदा घेऊन शासन,प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पत्रकारांना खोट्या गुन्ह्यंमध्ये अडकवून सोबतच वृत्तपत्रे बंद पाडण्याची कारस्थाने करीत पत्रकारांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करीत आहेत आहेत.हे सत्य ओळखून दैनिक,साप्ताहिक,डिजीटल मीडियाच्या सर्व पत्रकारांनी आता एकत्र आले पाहिजे.असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व इंडियन लॅग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) चे राष्ट्रीय सचिव संजय एम‌.देशमुख यांनी आष्टी शहीद येथे बोलतांना केले.कार्यक्रमातून परततांना त्यांनी गुरूकुंज मोझरी येथे पत्रकार महासंघाच्या सामाजिक साधनेचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वंदन करून त्यांच्या मानवसेवी कार्याला अभिवादन केले.

           लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या डिजीटल मिडियाचे अमरावती जिल्हा अध्यक्ष श्री देवेन्द्र भोंडे यांच्या "गावाकडील बातमी" या पोर्टलचा वर्धापन दिन,पोर्टल कार्यालयाचे उद्घाटन व महिला आणि पुरूषांचवरील अत्त्याचाराविरूध्द लढा देऊन विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या "गाव सहेली" या महिला समुहाच्या आष्टी तालूका शाखेची स्थापना असा संयुक्त कार्यक्रम  लोकस्वातंत्र्य संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री.संजय एम.देशमुख यांचे अध्यक्षतेखाली प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेला होता,त्यावेळी पत्रकार आणि उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

        लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने २०२१ च्या स्थापनेपासून मराठवाड्यातील जाफराबादच्या  हल्ल्यांपासून तर देवेन्द्र भोंडे यांचेवरील आणि ईतर विविध हल्ल्यांसोबतच पत्रकार कल्याण योजना,कोरोना मदती,आणि अन्यायाबद्दल शासनाकडे सतत केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती त्यांनी यावेळी दिली.परंतू ह्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी लोकस्वातंत्र्य महासंघाची संघटीत शक्ती वाढविण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.पत्रकार गावाकडील बातमी न्यूज पोर्टलकडून याप्रसंगी सर्वप्रथम दिप प्रज्वलन व महापुरूषांच्या वंदन करून सर्व उपस्थित अतिथी आणि पत्रकार बांधवांना शाल,स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

     या कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर आणि शिस्तबध्द नियोजन संपादक देवेन्द्र भोंडे आणि सहकाऱ्यांनी केले होतो.त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम होता हे विशेष.याबध्दल संजय देशमुख आणि उपस्थित अतिथींनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहनात्मक शुभेच्छा व्यक्त केल्या .यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे केन्द्रीय मार्गदर्शक पदाधिकारी व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य श्री पुष्पराज गावंडे,विभागीय संघना व संपर्क प्रमुख डॉ.शंकरराव सांगळे,दै.पुलगाव टाईम्सचे संपादक,ज्येष्ठ पत्रकार अनुपकुमार भार्गव,प्रमुख अतिथी म्हणून तर वज्येष्ठ पत्रकार लोकस्वातंत्र्य विदर्भ पदाधिकारी रावसाहेब देशमुख,अमरावती जिल्हाध्यक्ष गजानन जिरापूरे अॕड.पंकज जामनिक,पत्रकार मिलींद जामनिक,विनय इंगळे,श्रीकृष्ण रौराळे,गाव सहेली च्या सौ.मंगला भोगे, व पत्रकारांची  प्रमुख उपस्थिती होती.
         सव्वालाखे मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवेन्द्र भोंडे यांनी केले.कार्यक्रमाला लक्ष्मण राजुरकर,कैलास बनसोडे,दिपक पाटील,राकेश भोईर,निलेश रामगावकर,सदानंद खंडारे,अजय डाखोरे,भिमराव खंडारे,दिनेश जगताप,अनिल भंगाळे,आशिष धार्मिक,,बालाजी शेवाळे,परेश भन्नारे,अक्षय मनोहर,सुनिल कोसे,विशाल ठाकरे,अभिजीत डवरे,शिंक चौधरी,गाव सहेलीच्या निलिमा ठाकरे,शारदा ढोले,माधुरी दवंडे व सर्व पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या.संचालन सहेली पदाधिकारी व मिलींद जामनिक यांनी केले.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on