ज्येष्ठ पत्रकार नारायण सावंत यांच्याकडून (मुंबई)
लंडन बरो (दक्षिण) शहराचे महापौर सुनील चोप्रा यांची विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलला भेट
मुंबईचे माजी महापौर / माजी आमदार यांनी विलेपार्ले पूर्व येथे एका भव्य संकुलाची १९९८ साली निर्मिती केली या संकुलात १८ विविध क्रीडा प्रकारचे तज्ज्ञ प्रशिक खेळाडूंना प्राशिक देत आहेत
लंडन बरो दक्षिण विभागाचे आदरणीय महापौर हे नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले असता.त्यांनी प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलला भेट दिली.त्यावेळी त्यांनी संकुलात असणाऱ्या जागतिक दर्जाच्या जलतरण तलाव, जिमनॅस्टिक विभाग, नेमबाज विभाग (शूटिंग रेंज),स्केटिंग विभाग, व्यायाम शाळा(जिम) तसेच इतर विभागास भेट देऊन खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा याची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. या वेळी संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू, सचिव डॉ. मोहन राणे, विश्वस्त राजू रावळ, मकरंद येडूरकर उपस्थित होते. नंतर त्यांनी खेळाडूसह सर्व विश्वस्त यांचे सुध्दा त्यांनी अभिनंदन केले. अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय , राज्यस्तर आपल्या खेळाच्या कौशल्याने गाजवीत आहेत.