बारामती विधानसभा मतदार संघामधील सर्व मतदानकेंद्रा करिता स्थानिक कार्यकर्त्यांच्या बुथकमिट्या स्थापन करण्याची जबाबदारी किरण गुजर यांचेवर मा. अजितदादा पवार यांनी दिली आहे. याबाबत सर्वच बुथकमिट्यांचे पुनर्नियोजन केले जाणार असून बारामती तालुका शहरामधील प्रत्येक गाव प्रभागामध्ये जाऊन तेथील जेष्ठ युवक महिला युवती कार्यकर्त्याशी प्रत्यक्ष बोलून, त्यांची मते समजावून घेऊन पूर्वीच्या बुथकमिट्यांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना व जे या कामापासून बाजूला आहेत त्यांना बरोबर घेऊन बुथ कमिट्यांची पुनर्बाधणी करणार असल्याची माहिती किरण गुजर यांनी दिली आहे.
दिनांक ९ ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून प्रत्यक्ष कामास सुरुवात करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे व बुथकमिट्या स्थापणे नंतर त्याची पुढील जबाबदारी कामकाज व विधानसभा निवडणुकी पर्यतचे नियोजन करीत असल्याचेही गुजर यांनी नमूद केले आहे.