राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा निरिक्षक म्हणून बारामतीचे किशोर मासाळ
आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्षबांधणी जोरात चालु आहे. पक्षाच्या सातारा निरिक्षक म्हणून बारामतीचे किशोर मासाळ यांचेकडे जबाबदारी देण्यात आली आहे किशोर मासाळ युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत तसेच त्यांनी कर्जत जामखेड मतदार संघात पक्षनिरिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी मागील विधानसभेत केली होती अहमदनगर जिल्हा निरिक्षक म्हणून देखील जबाबदारी पार पाडली आहे. सातारा जिल्हात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे म्हणून पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी किशोर मासाळ यांची जिल्हा पक्षनिरिक्षक म्हणून मासाळ यांची निवड केली आहे.