राखी पौर्णिमेनिमित्त अजितदादांच्या पुतळ्याला राखी बांधून अभिवादन..!

0
44

राखी पौर्णिमेनिमित्त अजितदादांच्या पुतळ्याला राखी बांधून अभिवादन..!

बारामती : महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींची काळजी घेणारे आणि सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे दिवंगत आदरणीय अजितदादा पवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राखी पौर्णिमेनिमित्त बारामतीतील महिलांकडून त्यांच्या पुतळ्याला राखी बांधण्यात येणार आहे.
नटराज नाट्य कला मंडळ, बारामती तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बारामती शाखेच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. बारामतीतील लाडक्या बहिणी अजितदादांच्या पुतळ्याला राखी बांधून त्यांना आदरांजली अर्पण करणार आहेत. तसेच महिला भगिनींनीही या राखी बांधणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता, अजितदादा पुतळा स्मारक, तिरंगा सर्कल, बारामती येथे होणार आहे.
कार्यक्रमासाठी अॅड. प्रिया गुजर-महाडिक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. राखीच्या माध्यमातून भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे नाते व्यक्त करत अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा हा भावनिक उपक्रम ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here