येरवडा येथील क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

0
63

येरवडा येथील क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

पुणे, दि. २१ : विभागीय क्रीडा संकुल समिती, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व समाजकल्याण विभागाच्यावतीने व कैवल्यधाम आऊटरिच या संस्थेच्या सहकार्याने येरवडा येथील विभागीय क्रीडा संकुल येथे १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

योग दिनाच्या कार्यक्रमात उपसंचालक युवराज नाईक, तहसिलदार दिलीप आखडे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, सहायक समाजकल्याण आयुक्त मल्लिनाथ हरसुरे याच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, येरवडा येथील गेनबा मोझे शाळेतील विद्यार्थी आदींनी सहभाग घेतला.

याचबरोबर जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा संकुल, बारामती, तालुका क्रीडा संकुल मंचर, इंदापूर व खेड, पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळा व जिल्ह्यातील सर्व अनुदानित व विनाअनुदानीत शाळा, महाविद्यालयात योगदिनाचे आयोजन करण्यात आले. योग दिनाच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील एकूण २ लाख ८३ हजार नागरिक, अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी दिली.

Previous articleलोकशाही जगवा ! माणुस म्हणुन जगा..!!
Next articleबारामतीत विधानसभेची जोरदार चर्चा ; सामना रंगणार काय काका – पुतण्यांचा….!
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here