Homeलेखमोर्चा खुर्च्या यावर झालीच पाहीजे चर्चा

मोर्चा खुर्च्या यावर झालीच पाहीजे चर्चा

मोर्चा खुर्च्या यावर झालीच पाहीजे चर्चा
२२/२ रोजी मुंबईत जो अफाट जनसमुदाय जमला होता.महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातुन सामान्य माणुस दिवसरात्र प्रवास करुन सामाजिक बांधिलकीतुन आला होता.तसेच मुळ विषयाचा ज्यांनी अभ्यास करून समाजात जनजागृती केली.त्या सर्वांच्या सामाजिक बांधिलकीच्या कर्तव्याला, कर्तृत्वाला मी प्रणाम करतो.

राज्यातील जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत.त्यांनी आपली दखल घेतली.असे
असले तरी आम्ही आमच्या मांग मचक्याने व व्यासपिठावरील विचक्याने आम्ही केलेल्या ओंगळ प्रदर्शनाने पुन्हाअप्रत्यक्षात बेदखल झालो.हि शोकांतिका आहे.

यापुढे तरी पुढच्याच ठेच मागचा शहाणा असे तयार व्हा.जे शिष्ट मंडळ भेटणार आहे. त्यांच्यातला शिष्टपणा बाजुला ठेवा.शिष्टाई असते‌ ते दाखविणारे त्यांना संधी द्या.

ज्यांना कवडीचे ग्यान नाही ते कवड्याची माळ घालून हातात निवेदनाची परडी घेऊन अंबाबाईच्या दर्शनाला निघावे तसे निघतात.व चतुर राजकिय नेते त्यांच्या ओटीत जोगवा सामाजिक लाभ नव्हे थातुर मातुर आश्वासनाचा जोगवा टाकुन‌ मुळ स्थानी पाठवतात.

तेव्हा घासुन तलवारीला अभ्यासु धार लावणारे समाजाची शिष्टाई करणारे यांना शिष्ट मंडळात जाऊ द्या शेवटी संयोजक म्हणून श्रेय संयोजकालाच मिळणार आहे हे साधं गणित आमच्यातल्या नेत्यांनाच सोडवता येऊ नये.

श्रेयवाद कशात असतो.महत्व झाडाच्या फळांना असते. खोडाला नाही.आमचे नेते खोडच आवळुन धरतात. फांद्या छाटतात. त्यामुळे फांद्यांवरचे लाभाचे फळ वाढतच नाही.

जेव्हा शासनाचे प्रतिनिधी येतात.पक्षाचे प्रतिनिधी येतात.वास्तविक पाहता आपण जाऊन त्यांना निवेदन द्यावे लागते.असे असताना ते आपल्या आंदोलन स्थळी आले.निवेदन देताना त्यांनी स्विकारताना काही राज्य शिष्टाचार असतात. त्यालाहि आम्ही तिलांजली दिली.

मच्छीबाजार भरतो.तसे त्या मान्यवरा शेजारी काही अती उत्साही जमा झाले होते.खरे तर त्यांना सनदशीर मार्गाने निवेदन देताना ज्यांनी या प्रश्नावर अभ्यास केला. त्यांना त्याची काही शब्दांत मांडणी करु द्यायला हवी होती.त्या नंतर त्यांना निवेदन देऊन त्यावरील त्यांचा अभिप्राय त्यांच्याच शब्दात घ्यायला हवा होता.तसे काहीच झाले नाही मग हा एवढा द्रविडी प्रणायम कशासाठी केला होता.याचे उत्तर आमच्याकडे नाही.

मी नुसताच लिहतो असे नाही कृतीशील देखील असतो. फरक एवढाच डामडौल दाखवत नाही.मी संयोजन समितीला सुचविले होते अ,ब,क,ड वर्गीकरण,आर्टी या प्रश्नांची खरी झळ हि तरुण तरूणींना बसणारी आहे.आज त्यांना त्यांची खरी आवश्यकता आहे.त्यांना समाजाच्यावतीने या प्रश्नाचे प्रतिनिधित्व करणारे म्हणून पुढे आणले पाहीजे होते.ते‌ न होता आम्ही नेहमीच्याच भाषणबाजीला महत्व दिले.

आमच्यात अनेक संघटना आहेत त्या संघटना असल्याचं पाहीजे या मताचा मी देखील आहे.संघटना बांधनी करणाऱ्या नेत्याकडे कुशलता आहे.संघटन करणे हि देखील साधी बाब नाही घरादारावर तुळशीपत्र ठेवुनी तहान,भुक विसरून‌ अनेकांच्या शंका कुशंका ना सामोरे जाऊन संघटन करावे लागते.हि कुशलता आहे परंतु कौशल्य नाही कौशल्य म्हणजे‌ नेमके काय?

एखाद्या कार्यक्षमतेत किंवा एखाद कार्य करण्यासाठी कौशल्याचा वापर करतात , जी एखाद्या व्यक्तीद्वारे पद्धत शीर शिक्षण,सराव किंवा अनुभवाद्वारे प्राप्त केली जाते. प्रवीणता मिळविण्यासाठी केलेले निरंतर प्रयत्न आणि सुधारणांचा हा परिणाम आहे. skill आपल्याला कार्य सक्षमपणे पार पाडण्यास सक्षम करते.या कौशल्य महत्त्वपुर्ण बाबींकडे लक्ष देऊन आम्ही संघटना चालविली पाहिजे.हे न होता संघटनात व्यक्तीचे अवास्तव स्तोम व भाषणबाजी याचाच सुकाळ असतो.व संस्कारक्षम कौशल्याचा दुष्काळ असतो.

आमच्यात प्रगल्भतेचा व परिपक्वता यांचा अभाव! मी पणा अहंकार यांचा भाव!त्यामुळे लागत नाही कोठे निभाव!

विचारवंताना मुर्ख ठरण्याचे तर्क या समाजात रूजले आहे प्रा.अंभोरे प्रा.अवचार,अवचरे तोंडारकरअसे किती तरी विचारवंत अभ्यासु सामान्य जन तेथे आले होते.त्यांना दुर ठेवले जाते.

त्याच त्याच पुढऱ्याकडून अभ्यास!सामाजिक कार्याचा भास निर्माण केला जातो. केवळ भास!त्यामुळे या संघटनांचे स्वकिय समाजाला तसेच बहुजन समाजाला आमच्या संघटनाची महत्व भीती आदरयुक्त दरारा वाटत नाही. हि आमची शोकांतिका आहे यावर संघटना प्रमुख, विचारवंतानी अभ्यासपूर्वक संशोधन केले पाहीजे.ते होत नाही.किमान यापुढे तरी ते झाले पाहीजे.

आम्हाला आमच्या जनसमुदायाचे शक्ती प्रदर्शन करायचे होते.डामडौलाचे प्रदर्शन करायचे नव्हते.खरे तर हा आमचा बैठका सत्याग्रह होता.मुळात मोर्चा नव्हताच या सत्याग्रहात असंख्य खुर्च्या कशासाठी हव्या होत्या.खरे‌ तर शासकिय कार्यालयात खुर्च्यावर बसणारी तरुणाई आम्हाला घडवायची हि दुरदृष्टी हा विचार व्हिजन दुर ठेवून आम्ही खुर्च्यावर बसुन आमचीच हौस भागविण्याचे हे नियोजन केले होते.असे दुर्दैवाने म्हणावे वाटते.

नेहमीचेच कलाकार वर आसनस्थ व खालचा समाज ऊन वाऱ्यात तळपळत होता. त्यांच्या रक्तात लहुजीची तळपती समशेर असल्यामुळे त्यांना त्यांचे काही वाटत नव्हते.हे असले तरी जाणकारांनी त्यांच्यावर सावली धरायला पाहीजे होती

मागास समाजातील एक वरिष्ठ नेते,दीनदुबळ्याना काही मिळाले नाही व‌ नेतेच उपभोग घेत राहिले की,ते म्हणायचे जिच्यासाठी लुगडी! तीच उघडी!तसेच घडले

त्यामुळे मोर्चा,खुर्च्या यावर चर्चा झालीच पाहीजे त्याबाबत कोणावर दोषारोप किंवा त्यांच्या चुका आम्ही काढत नाही तर त्यामागील भाव‌ना आहेत.त्या यापुढील जनजागृतीसाठी महत्वाच्या आहेत.

ज्यांना आम्ही पुढे आणायला पाहीजे त्यांनाच मागे ठेवतो. पुढे आला तो पुढारी होतो.
आम्ही का?मागे राहिलो किती दिवस मागे राहणार आहोत. आमचीच प्रतिमा आमची कशी वैरी होते.याची चर्चा कधी करणार आहोत की, नाही.गालिबचा एक शेर आहे उम्रभर गालिब यही भुलं करते रहा!धुल चेहरे पर ती और शिशा साफ करते रहा! तसे आम्ही आमच्यातील कृती, वृत्ती,प्रवृतीची समिक्षा करीत नाही.दोष मात्र राजकिय पक्षांना बहुजनांना देतो. आमची दखल घेत नाही.

आमच्यात परिवर्तन होण्या साठी संस्कार तोच तुमचा धर्म प्रशिक्षितपणा,प्रगल्भता,परिपक्वता हे आम्ही शिकणे हि काळाची गरज आहे.काळाची पावले ओळखुन आम्ही प्रगतीची दिशा ठरविली पाहीजे.चला तर दिशादर्शक समाज घडवू! शासनाला आमच्या भावना कळवू
गेलेली प्रतिष्ठा कमवु!सकळ समाज एका छत्राखाली जमवु!समाजाला हवे तेच मिळवु!
आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on