मोटरसायकल चोरांची टोळी बारामती शहर पोलिसांच्या ताब्यात

0
168

मोटरसायकल चोरांची टोळी बारामती शहर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी :
बारामती शहरातील मोटरसायकल चोरांना बारामती शहर पोलिसांनी ताब्यात घेतले घेतले असून त्यांच्याकडून तीन मोटर सायकली जत केल्या आहेत. गुडु उर्फ वैभव बाळू बगाडे (वय २० वर्षे रा. जवाहरनगर भोई गल्ली) अक्षय हरिदास सोनवणे (वय २५ वर्षे रा. जवाहर नगर ) रोहित राजेंद्र खरात ( वय १९ वर्ष) असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरील तिथे मौज मजेसाठी मोटर सायकली चोरत असल्याची गोपनीय माहिती बारामती शहर पोलिसांना मिळाली होती सदर माहितीच्या आधारावरून पोलिसांनी वरील तिघांना ताब्यात घेतले. सदर आरोपींकडे अजून चौकशी करून आणखी काही गुन्हे केले आहेत का याबाबत पोलीस माहिती घेत आहेत. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांचे मार्गदर्शना खाली सपोनि संकपाळ, पो. हवा. रामचंद शिंदे, पो. हवा. दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, अभिजीत कांबळे, पो. कॉ. तुषार चव्हाण, पो. कॉ. दशरथ इंगोले, पो.कॉ. अक्षय सीताप, पो. कॉ. सागर जामदार, पो. कॉ. शाह राणे यांनी केली.

Previous articleचाचा नेहरू बाल महोत्सवात आठशे बालकांचा सहभाग
Next articleगेवराईच्या सरकारी दवाखान्यात भाजप आमदारांनी घेतले उपचार
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here