मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात

0
27

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात

महिलावर्गात समाधानाची भावना-उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर

बारामती, दि. १५: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेकरीता बारामती तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून एकूण ६६ हजार ४३३ अर्ज लाभाकरीता पात्र ठरले आहेत, पात्र ठरलेल्या महिलांना १४ ऑगस्टपासून प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाल्यामुळे महिलावर्गात समाधानाची भावना व्यक्त होत आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली आहे.

या योजनेअंतर्गत तालुक्यात एकूण ६८ हजार ४२४ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ६६ हजार ४३३ अर्ज लाभाकरीता पात्र ठरले आहेत. प्रशासनाच्यावतीने प्राप्त प्रत्येक अर्जाची छाननी करण्यात आली. छाननीअंती पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात १४ ऑगस्टपासून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याकरीता तालुका प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने अहोरात्र काम करीत आहेत. पात्र महिलांना विनाअडथळा अर्ज करता यावा, याकरीता ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या सूविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. ऑफलाईन अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वांवलंबीकरण, आत्मनिर्भर करण्याबरोच महिलांच्या सशक्तीकरणाला चालना देण्याकरीता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत समाजातील सर्व घटकातील पात्र महिलांना प्रतिमाह १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येणार असून त्याकरीता महिलांनी तात्काळ अर्ज करावे, असे आवाहन श्री. नावडकर यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here