HomeUncategorizedमी माझ्या घरी आलो शाल गुंडाळून फेकून दिली दार लावून घेतलं बाबासाहेबांचा...

मी माझ्या घरी आलो शाल गुंडाळून फेकून दिली दार लावून घेतलं बाबासाहेबांचा फोटो छातीशी आवळून घट्ट धरलाआणि हंबरडा फोडत ओरडलो…..

चळवळ,चळवळ आणि चळवळ.

मी त्याला म्हणलं
आता चळवळीत या
चळवळीचं काम हातात घ्या
तो म्हणाला
आता शिक्षण सुरू आहे
तुम्ही नंतर या…

त्याच शिक्षण झालं
मी पुन्हा त्याच्याकडे गेलो
म्हणलं आता चळवळीत या
तो म्हणाला
आता कुठं शिक्षण पूर्ण झालं
नोकरीच्या शोधात आहे
तुम्ही नंतर या…

तो नोकरीला लागला
मी परत त्याच्याकडे गेलो
मी पुन्हा म्हणलं
चला आता चळवळीत या
तो म्हणाला
आता कुठं नोकरी लागली
लग्न करावं म्हणतोय
तुम्ही इतकं फिरत असता
जरा तुम्हीच मदत करा
एखादी चांगली श्रीमंत मुलगी शोधून द्या…

त्याच लग्न झालं
त्याला मुलं झाली
मुलं मोठी झाली
त्यांची लग्न होऊन
त्याला नातवंडं झाली
गाडी आली
बंगला झाला

मी त्याच्या बंगल्यात गेलो
त्याला चळवळीत या म्हणणार तोच
त्याने हॉल मध्ये सर्वांना बोलावलं
त्याची मुलं
त्याची बायको
त्याच्या सुना
आणि त्यांची नातवंडं
सगळे हजर झाले
आणि त्याने
“चळवळीसाठी
झिजलेला एक कार्यकर्ता” म्हणून
माझी ओळख करून दिली
इतकंच नाही
तर एक शाल पांघरून
त्याने माझा सत्कार ही केला

मी माझ्या घरी आलो
शाल गुंडाळून फेकून दिली
दार लावून घेतलं
बाबासाहेबांचा फोटो
छातीशी आवळून घट्ट धरला
आणि हंबरडा फोडत ओरडलो
जय भिम
जय भिम
जय भिम….

दंगलकार नितीन चंदनशिवे
कवठेमहांकाळ
जि.सांगली
7020909521 (संपर्क साधू शकता)

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on