मित्राला फसवणाऱ्या व्यक्तीला न्यायालयाचा दणका — १० दिवस साध्या कारावासाची शिक्षा….!
काटेवाडी, …. प्रतिनिधी
काटेवाडी येथील आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात एका व्यक्तीने अडचणीत असलेल्या मित्राला मदत म्हणून २ लाख ३५ हजार रुपये दिले होते. या रकमेची सतत परतफेडीची मागणी करूनही पैसे परत न दिल्यामुळे पीडित मित्राने न्यायालयात धाव घेतली.
घटनेच्या तपशीलानुसार, आरोपी मित्राने बँकेत पैसे नसल्याचे कारण देऊन फसवणूक केली. पीडिताने न्यायालयाकडे आपले पैसे परत मिळविण्यासाठी मागणी केली होती. बारा मती येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दुर्गा प्र. पुजारी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली.
आरोपीला दोषी ठरवत न्यायालयाने त्याला १० दिवस साध्या कारावासाची शिक्षा व १,००० रुपये दंड ठोठावला. याशिवाय न्यायालयाने आरोपीला एक महिन्याच्या आत २ लाख ५० हजार रुपये भरपाई स्वरूपात देण्याचे आदेश दिले.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कामकाज फिर्यादी अँड. कुणाल जाधव जाधव तसेच अँड.अजित बनसोडे यांनी व त्यांच्या असोसियटचे सदस्य यांनी कामकाज हाताळले. या निकालामुळे फसवणुकीच्या प्रकरणांवर कठोर पावले उचलण्याचा न्यायालयाचा इशारा दिला गेला आहे.