मितवा श्रीवास्तव -सांस्कृतिक साहित्य कला क्षेत्रातील पुरस्काराने सन्मानित
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद १४वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन सासवड येथे संपन्न झाले.
सदर साहित्य संमेलनात साहित्य कला व सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
करमाळ्यात भरतनाट्यम् नृत्याचा प्रारंभ मितवा श्रीवास्तव अग्रवाल यांनी गुरुवर्य मा.मयुरी ताई जोशी पुणे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून केला.
आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्र व इतर राज्यातून तर विद्यार्थीनी या कलेचा लाभ तर घेत आहेत, पण देशाबाहेरील अनेक विद्यार्थीनी देखील भरतनाट्यम् या कलेचा लाभ घेत आहेत. सातासमुद्रापार करमाळा सारख्या ग्रामीण भागाचं नाव भरतनाट्यम् च्या माध्यमातून दूर पोहचवण्याचं काम मितवा श्रीवास्तव यांनी केले आहे.
मितवा यांचा एक मराठी काव्य संग्रह प्रकाशित झाला असून एक हिंदी कविता संग्रह व गझल संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
ह़ंबीरराव मोहिते यांचे १४ वेवंशज राजेंद्र बाजी मोहिते, इतिहास संशोधक व संमेलनाचे अध्यक्ष डॉ.बालाजी जाधव व मा.विजयकुमार कोलते व दशरथ यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर गौरव मितवा श्रीवास्तव व मयंक अग्रवाल यांनी स्विकारला.