माळेगाव साखर कारखान्याच्या कामगार संचालकपदी मळदचे महादेव शेंडे यांची निवड !

0
31

माळेगाव साखर कारखान्याच्या कामगार संचालकपदी मळदचे महादेव शेंडे यांची निवड!

राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कामगार संचालकपदी मळद गावातील कामगार महादेव आप्पाजी शेंडे यांची निवड करण्यात आली.

या निवडीच्या वेळी चेअरमन केशवराव बापू जगताप, माजी चेअरमन बाळासाहेब भाऊ तावरे, व्हाइस चेअरमन राजेंद्र नाना ढवाण पाटील, तसेच संचालक मंडळ, कामगार नेते राजेंद्र तावरे आणि संघटनेतील सहकारी उपस्थित होते.

नितीन दादा शेंडे यांनी अजित दादा पवार, खासदार सौ. सुनेत्रा वहिनी पवार आणि संपूर्ण संचालक मंडळाचे आभार मानले.

यावेळी केशवराव बापू जगताप, संचालक मदनराव देवकाते, सुरेशराव खलाटे, राजेंद्र तावरे यांनी अभिनंदनपर भाषणे केली.

या ऐतिहासिक क्षणी दूध संघ संचालक शहाजी काका गावडे पाटील, रामचंद्र नाना मदने, दादा राम झगडे, बाळासाहेब गवारे, युवराज नाना शेंडे, नाना गावडे पाटील, सागर गावडे पाटील, त्रिंबक अप्पा सातव, किरण गावडे पाटील, राजेंद्र ढवाण, विशाल गायकवाड सर, राजेंद्र गायकवाड, बाळासाहेब शेंडे, संजय शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मळद गावाला पहिल्यांदाच या पदाचा सन्मान प्राप्त झाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here