माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची घोषणा, २२ जून रोजी मतदान
बारामती प्रतिनिधी | बारामती
बारामती तालुक्यातील नामांकित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे, कारण या कारखान्याचा परिसरातील शेतकरी, कामगार आणि सहकारी क्षेत्रावर मोठा प्रभाव आहे.निवडणूक कार्यक्रमपुढीलप्रमाणे:उमेदवारी अर्ज दाखल – २१ मे ते २७ मे २०२५ छाननी प्रक्रिया – २८ मे रोजी
अर्ज मागे घेण्याची मुदत – २९ मे ते १२ जून अंतिम उमेदवार यादी जाहीर – १३ जून मतदान प्रक्रिया – २२ जून
मतमोजणी व निकाल – २४ जून जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी प्रकाश अष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.आता उमेदवारांच्या यादीकडे, गटांच्या घडामोडीकडे आणि रणनितीक डावपेचांकडे संपूर्ण परिसरातील जनतेचं लक्ष लागून राहणार आहे. कारखान्याच्या भविष्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
