HomeUncategorizedमहिला दिनानिमित्त टच फिल नावाचे सेंद्रिय सॅनिटरी नॅपकीन प्रॉडक्ट बाजारात...!

महिला दिनानिमित्त टच फिल नावाचे सेंद्रिय सॅनिटरी नॅपकीन प्रॉडक्ट बाजारात…!

१४/०३/२०२३ रोजी AHF ( अवनी हेल्पो फाऊंडेशन ) सेक्शन ८ कंपनी , कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय अंतर्गत , भारत सरकार व निलम संस्कृती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ( स्वच्छ भारत अभियान , राष्ट्रीय स्वच्छ्ता केंद्र , पेयजल एवं स्वच्छ्ता विभाग जल शक्ती मंत्रालय , स्वास्थ एवं परिवार कल्याण मंत्रालय , प्लास्टिक मुक्त भारत अभियान ) मार्फत महिला आरोग्य अभियान अंतर्गत सेंद्रिय सॅनिटरी नॅपकीन याचा वापर जास्तीत जास्त महिलांनी करावा त्यासाठी AHF कंपनी व निलम संस्कृती फाऊंडेशन यांनी बाजारात ०८/०३/२०२३ रोजी महिला दिनानिमित्त टच फिल नावाचे सेंद्रिय सॅनिटरी नॅपकीन प्रॉडक्ट बाजारात उतरविले असुन ते पूर्ण पणे नाशवंत असल्याने त्याचा वापर व त्याला पुणे , मुंबई , गुजरात राज्य या भागांतून महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे..तरी सदर आरोग्य अभियान व उपक्रम या मार्फत AHF कंपनी सर्वसाधारण महिला ते व्यावसायिक अभ्यासक्रम यामार्फत प्रशिक्षण व मार्गदर्शन देऊन महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तरी या उपक्रम बाबत AHF कंपनी चे संचालक ( प्रकल्प व्यवस्थापन व नियोजन विभाग ) एम.एम. भडके सर तसेच AHF कंपनी चे टी.खैरे सर – सहा.संचालक ( प्रशासकीय विभाग तथा आर्थिक व्यवहार विभाग ) यांनी दिनांक ११/०३/२०२३ रोजी मुंबई मराठी पत्रकार भवन इथे झालेल्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष यांच्या मार्फत पत्रकार परिषदेत तसेच १२/०३/२०२३ रोजी पनवेल तालुका येतील महिला महासंघ वर्धापन दिनानिमित्त आयोजक सौ.निर्मला चौधरी मॅडम यांच्या समवेत सदर उत्पादन बाबत माहिती सांगितली की हे प्रॉडक्ट सध्या बाजारात असलेल्या इतर प्रॉडक्ट पेक्षा जास्तीत जास्त उपयुक्त तसेच केमिकल व प्लास्टिक मुक्त असुन याचा शरीरावर चांगला परिणाम होत आहे आणि मार्केट मध्ये असे अनेक उत्पादन आहेत की जे ऑरगॅनिक आहेत परंतु इतके जास्त किमतीचे आहेत की सर्वसामान्य महिला ते घेऊ शकत नाही त्याच विचारांवर AHF व निलम संस्कृती फाऊंडेशन यांनी हे उत्पादन बाजारात आणले आहे. तसेच इतर सर्वसामान्य उत्पादनात प्लास्टिक असल्याने महिलांना कॅन्सर , PCOD व इतर मोठे आजार याना कालांतराने सामोरे जावे लागत आहे . आपल्या देशात सेंद्रिय सॅनिटरी नॅपकीन याचा हवा तेवढा प्रसार झाला नसल्याने महिलांना या आजार व सेंद्रिय सॅनिटरी नॅपकीन याबाबत जास्त कल्पना नसते. टच फिल हे पूर्ण पने

ऑरगॅनिक सॅनिटरी नॅपकीन असून यात A ग्रेड चे कॉटन वापरले आहे तसेच हे ७ लेयर चे आणि यात बॅक्टेरीया मारण्याची क्षमता आहे , महिलांचे अनियमित मासिक पाळी , PCOD व इतर आजार यावर हे उपयुक्त ठरतं आहे . यात हार्मोन्स नियंत्रण व शरीर दुःखी तसेच शोषण क्षमता ही जास्त असल्याने व २४ तास पूर्ण पने चांगले राहत असल्याने महिला वर्गात याची प्रचंड मागणी वाढत असल्याचे दिसत आहे आणि सर्वसामान्य महिलांना हे परवडू शकते अशी

६५रू फक्त एका पाकीटाची किंमत असल्याने महिलांना ते घेण्यास उपयुक्त ठरत आहे. यासाठी कंपनी व संस्था यांनी शाळा , कॉलेज , शासकीय व निमशासकीय कार्यालय , स्थानिक स्वराज्य संस्था , खाजगी कंपनी , रुग्णालय व इतर कार्यालय व आस्थापना विभाग या ठिकाणी लवकरच उपक्रम समन्वयक यांच्या मार्फत पत्रव्यवहार करून अभियान शिबिर लावून महिलांना याची माहिती , विक्री व व्यवसाय देण्याचे सुरू करणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. तरी सध्या महाराष्ट्र राज्य या मध्ये ज्या संस्था , महिला , महिला बचत गट , युवा पिढी व इतर वर्ग याना या मार्फत रोजगार देण्याचे सुरू होणार आहे तसेच याबाबत ज्यांना हे उपक्रम आपल्या जिल्ह्यात राबवायचे असतील त्यांनी उपक्रम जिल्हा अधिकारी यांना संपर्क करावे तसेच आपल्या आपल्या जिल्ह्यातील भागात जास्तीत जास्त सेंद्रिय सॅनिटरी नॅपकिन उपक्रम लावून ते महिलांकडे पोचवावे जेणे करून महिलांच्या आरोग्याचा एक विषय मार्गी लावण्यासाठी मदत होईल यासाठी आम्ही आमचे नियुक्त अधिकारी यांचे क्रमांक व विभाग देत आहोत ज्या इच्छुक संस्था किंवा इतर आस्थापना असतील त्यांनी संपर्क करून या मार्फत महिलांना हे उत्पादन व विक्री या मार्फत करण्यास मदत करू किंवा सहभागी होऊन स्वतः करू शकतात. AHF- पुणे व मराठवाडा विभाग अधिकारी – आर कुलकर्णी – 79729 03072 , सांगली / कोल्हापूर / सातारा व विदर्भ विभाग अधिकारी – एस.पाटील – 9067445004 , सांगली / कोल्हापूर / सातारा व विदर्भ विभाग ( प्रशा.अधिकारी ) – कोटेचा सर – 9764203768 , AHF गुजरात राज्य( प्रकल्प व्यवस्थापन अधिकारी ) एच.रावल – 8401314462. तरी सदर अभियान अंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिसाद देण्यासाठी आम्ही त्यांना आव्हान करतो तसेच याचा वापर महिलांनी करून आपल्या आरोग्याला होणारा धोका टाळावा

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on