महासंस्कृती महोत्सवाअंतर्गत होणारे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून अधिकाधिक नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. नावडकर यांनी केले आहे.

0
97

बारामती, दि.२७:  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्यावतीने २८ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत गदिमा सभागृह, बारामती येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना दिली.

उद्घाटन सभारंभात ढोल ताशा पथक, गणेश वंदना व वारसा संस्कृतीचा असे कार्यक्रम सादर करण्यात येतील. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा. गरजा नाट्यछटांचा, दुपारी १२ वा. क्लाऊन माईम ॲक्ट, रात्री ७ ते ९ या वेळेत पुरूषोत्तम महाराज पाटील यांचे किर्तन, २९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते ११ या वेळेत ‘यदा कदाचित रिटर्न्स’ नाटक, १ मार्च रोजी सायं. ४ ते रात्री ८ या वेळेत विनाशलीला, ना ना नाना, चाहूल या एकांकिका, रात्री ८ ते ११ या वेळेत ‘तुझी आठवण’, २ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ‘बोक्या सातबंडे’ हे नाटक, दुपारी २ ते सायं. ५ या वेळेत लाली, भुताचं भविष्य, लेबल या एकांकिका आणि सायं ५ ते रात्री ९ या वेळ गीत रामायण तर ३ मार्च रोजी दुपारी ३ ते रात्री ७ यावेळेत नेकी, मजार, बी अ मॅन या एकांकिका आणि रात्री ८ ते ११ यावेळेत शिवदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.

महासंस्कृती महोत्सवाअंतर्गत होणारे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून अधिकाधिक नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. नावडकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here