महाराष्ट्रात अनोखा उपक्रम डाळज नं.३ ग्रामपंचायत आणि पवार हॉस्पिटल बारामतीच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न

0
229

महाराष्ट्रात अनोखा उपक्रम डाळज नं.३ ग्रामपंचायत आणि पवार हॉस्पिटल बारामतीच्या वतीने ग्रामपंचायत व हॉस्पिटलच्या वतीने मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर संपन्न

बारामती : bhavnagari प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील पहिलेच असे आगळे- वेगळे शिबिराचे आयोजन असावे !
‘पवार हॉस्पिटल बारामती व ग्रामपंचायत डाळज नं.३” यांच्या संयुक्त विद्यमाने
मोफत सर्व रोग निदान शिबिर दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी संपन्न.. या शिबिरामध्ये ग्रामपंचायतच्या हद्दीतील सर्वस्तरातील नागरिकांना सुचित करून तपासण्या मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर आयोजित करून एकआगळं वेगळा जनतेच्या हिताचा उपक्रम घेऊन डाळज नं. ३ ने ग्रामीण लोकांच्या हिताचा आरोग्यासाठी आरोग्यदायी उपयुक्त असे शिबिराच्या कार्यक्रमाचे इंदापूर पुणे जिल्ह्यात पंचक्रोशीत सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त होऊन पवार हॉस्पिटल बारामती व ग्रामपंचायत डाळज नं.३चे अभिनंदन
होत आहे..!


वरील आरोग्य शिबिरात (शुगर ),(बी .पी.)(इ .सी .जी)( मणका ) , (हाडाणची तपासणी) (स्त्री रोग तपासणी) व (समुपदेशन )सकाळी दहा ते एक या वेळेत एकूण 183 रुग्णांच्या विविधप्रकारच्या तपासण्या करून निदानचा सल्ला व पुढील औषध उपचारांचे कल्पना

सर्व तज्ञ डॉ. सुनील रामदास पवार डॉ. विठ्ठल रामदास पवार डॉ.रुचा सुनील पवार डॉ. पद्मश्री विठ्ठल पवार डॉ. वासुदेव पिसे यांच्यावतीने त्या – त्या रुग्णांना आजारावर निश्चित सल्ला देण्यात येत असत अश्यारित्या शिबीर संपन्न झाले..!

हे शिबिर यशस्वीतेसाठी डाळज नं.३ सरपंच अमित जाधव यांनी सहकार्य व पुढाकार घेत तसेच शिबिरास विशेष सहकार्य लाभले ते रामभाऊ गायकवाड, गणेश जाधव ,रोहित शितोळे, तुषार जगताप, सत्यभामा जगताप, तानाजी जगताप, मिलिंद शिंदे व सर्व सदस्य ग्रामपंचायत डाळज नं.३ ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सर्व रोग आरोग्य निदान शिबिर उत्साहात संपन्न झाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here