मराठा आरक्षण!याचे कायम स्वरुपी व्हावे रक्षण
होण्यासाठी आरक्षणाचा तळ शोधला पाहिजे. कोणत्याहि विस्थापित समाजाची अवहेलना हि त्यांचेच प्रस्थापित करीत असतात.कारण समाजातील विस्थापित जितके त्यांचे गुलाम, अनुयायी असतात त्यावरच त्यांची सामाजिक राजकिय प्रतिमा व प्रतिभा असते. अनेक शाहिराने तंतोतंत परीस्थिचे मर्म शोधुन हे शाहिरी केली आहे.
हमे तो आपनोको लुटा गैरो में कहां दम था कस्ती वहां डुबी जहां पानी कम था!पानी कमचा अर्थ आमच्यातले अज्ञान आमच्यातली व्यक्ति विशेष अंधश्रध्दा ! आम्ही हि त्याला बळी पडतो.जाणिव झाली की, आंदोलन करतो परंतु ते उम्रभर गालिब यही भुल करते रहा धुल चेहरे पर थी शिशा साफ करते रहा.राजकारण्याचा धुर्तपणा आम्ही शोधलाच नाही.
यामुळेच गेली चाळीस वर्षे आरक्षणाचे आंदोलन.सुरु असुन हि यश पदरात पडत नाही.उम्रे दराजसे मांगकर लाए चार दिन दो कटे आरजु में दो कटे इंतजार में अशी आजवरच्या आंदोलनाची स्थिती होता गेली.
वंदनिय आण्णासाहेब पाटील शहीद झाले. अनेकानी नैराश्यातून आपला देह संपविला.५८ मोर्चे जगाने नोंद घ्यावी असे झाले.त्यात हि काही गद्दार होऊन सरदार झाले.
महाराष्ट्र हा मुळात मराठ्यावरच घडला आहे महाराष्ट्र काय कोणतेहि राष्ट्र हे शेती या व्यवसायावर विकसित होत असते.त्यावर आलुतेदार बलुतेदार व स्वतःशेतकरी म्हणजेच मराठा जगत असतो.याच शेतीकडे शेतकऱ्याने रोजी रोटी म्हणुन पाहिलेच नाही.
सोन्यासारखी शेती धनदांडग्याना विकत राहिले.व त्या पैश्यावर नवनिर्माण करण्या ऐवजी राजकारण आय्याशी करीत राहिले.दलाल लाल झाले व खरा मातीचा लाल कंगाल झाला
आधुनिकता जागतिकीकरण या गोंडस नावाने त्यावर शेतीला पुरक अशा वस्तुच्या कंपन्या धनदांडग्याच्या उभ्या राहिल्या.खरे तर हे शेतकरी व त्याची बलुतेदारी करणारे हे व्यवसाय उभे करु शकले असते.ते स्वतः हि केले नाही व इतरांना हि करु दिले नाही.त्यामुळे भविष्यातील दारिद्र्याची चाहुल कधी लागलीच नाही
पद्मश्री राहीबाई पोपीरे या आज हि एखाद्या धनदांडग्याच्या कंपनीला लाजवतील असे बीज संकलनाचे काम करीत आहेत.सत्तापिपासु धर्म पिपासु यांचे ऐकुन शेतीकडे न पाहता राजकारण,धर्मकारण याकडे पासुन मुळ समाज कारण हे विसरुन गेले.
बाराबलुतेदाराना कष्टकऱ्यानां कस्पटा समान लेखु लागले. परिणामी शहरे बकाल होऊन खेडे ओसाड पडु लागले.राजकारणी राजकारणाच्या झोक्यावर तरुणाईला झुलवु लागले.बापाला बाबा न म्हणता नेत्याच्या पुढे बाबा दादा करु लागले.घराच्या पवित्र घराला घर समजण्या पेक्षा धाबा अन्नछत्र वाटी लागले.घरकी मुर्गी दाल बराबर तर धाब्यावरची कोंबडी तंदुरी चवदार वाटी लागली.मराठ्याची मुल त्यावर झोके घेऊ लागले.
खताचे ,बी,बीयाणे दुग्ध व्यवसाय,फळप्रक्रिया व्यवसाय यात मराठा समाज पुढे आला नाही. तर परप्रांतीय धनदांडगे यांचा शिरकाव झाला त्याला अभिमानाने शेट म्हणु लागले.परंतु आपल्याच शेतावर राबणाऱ्याना कस्पटासमान वागवु लागले.धुर्तानी मराठ्याची हि नाडी ओळखली व गावागावात फोडाझोडाचे राजकारण सुरु झाले.
यावर सर्व समाजाना झुलवित राजकारणी स्वतःच्या शेतीचे शेकडो एकराचे प्लाॅट सुजलाम सुफलाम करु लागले. सामान्य शेतकऱ्यांची धरण उशाला!कोरड घशाला!अशी स्थिती केवळ निर्माण झाली नाही तर धरणात मुतु का,या शब्दानी राबणाऱ्या शेतकऱ्यांची अवहेलना करु लागले. त्यातुन शिक्षण सम्राट साखर सम्राट एवढ्यावर भागत नाही म्हणून की, काय आता तर वाईन या गोंडस नावाखाली दारु सम्राट निर्माण होऊ लागले.यातुन शेतकऱ्यांची दारुण अवस्था होऊ लागली.
आजही धुर्त राजकारणी समाजात फोडाझोडाची बीजे पेरीत आहे.याचा शोध व बोध भावनिक तरुण घ्यायला तयार नाही.लिंगायत कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेत सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांना केवळ विना अटच नाही तर शिक्षण हिच काळाची गरज आहे हे मनावर बिंबवून शिक्षण दिले जात होते.आज तेथे हि राजकारण्यांचा हस्तक्षेप झाला आहे.शैक्षणिक संस्था शिक्षण सम्राटाच्या आहेत.तेथे परप्रांतीयाना देणग्यावर प्रवेश दिला जातो.गरीब दुबळा दारा पर्यंत देखील पोहचत नाही.याचे देखील सर्व्हेक्षण झाले.पाहिजे.
शासकिय शिक्षण बंद करुन शासन शिक्षणाचे खाजगीकरण करीत आहे.व दारु मोकळी करत आहे.आमचे जगणे दारुण होणार आहे.यावर आम्ही आवाज उठवत नाही तो उठवला पाहिजे कारण हे एक उच्चभ्रुचे आम्हाला आयुष्यातुन उठवुन जातीयतेची उतरंड मजबुत करण्याचे षडयंत्र आहे.
शासकिय नोकऱ्या शैक्षणिक प्रगती यांची तुलनात्मक मांडणी करताना अनेक जण ज्यांना आरक्षण आहे त्यांच्या हेवा करतात.परंतु त्याचा अभ्यास कोणी करीत नाही तेथे हि फार मोठी सामाजिक उतरंड आहे.मराठ्याची आज मितीला नसेल या हुन गंभीर अवस्था आहे.बळी तो कान पिळी असे आरक्षण सुरू आहे.अनु जाती व जमातीच्या अनेक जाती पर्यंत आरक्षणाची वाढी पोहचतच नाही.यावर हि संशोधन झाले पाहिजे. मराठा समाज शैक्षणिक मागासलेपणाचे दाखले देताना मार्काची तफावतीचे दाखले देतात हे जे तफावतीचे मार्क आहेत ते देखील काही समाजाला मिळत नाही तिथं पर्यंत देखील ते जाऊ शकत नाही यावर हि मराठा समाजानने संशोधन केले पाहिजे.
भविष्यात मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यावर गरीब दुबळ्याच शोषण तिथे होत राहिल व पदरात काहीच पडणार यासाठी दक्ष राहणे याचा अभ्यास देखील सामान्य कार्यकर्त्यांना करावा लागेल.कर्ज माफी सरकार करते त्याचा लाखोंचा लाभ प्रस्थापितच घेतात शेवटी पदरात काय पडणार आहे याचा दुरदृष्टीने विचार करून आरक्षणाच्या चौकटीला अनेक पैलुचे बारकाव्याचा अभ्यास करुन योग्य आकार दिला पाहिजे.
आज आमच्या चुली बंद असल्यामुळे आमचेच रक्त पिऊन रक्त पिपासु झालेल्या राजकारण्यांना मुळासकट उखडून टाकण्याची मानसिकता आमची तयार झाली पाहीजे.आम्ही विचार केला पाहिजे केवळ सामाजिक कार्यात एक जरांगे निर्माण होऊन भविष्य उज्वल होणार नाही तर राजकारणाची धुरा निस्वार्थपणे सांभाळणारे अनेक जरांगे तयार झाले पाहिजेत. आंदोलनकर्त्यानी आता केवळ फांद्या झाटत बसु नये.रंग दिलेले गाजर आहे की, मुळा आहे याची पारख केली पाहिजे.
गलिच्छ,भ्रष्ट एवढेच नाही तर जातीवादाची बीजे एकदुसऱ्याच्या मनात पेरणारे धर्माध सत्तालोलुप राजकारणी मुळा सकट उखडुन टाकले पाहिजे.व या महाराष्ट्राच्या भुमीचे रक्षण केले पाहिजे.तोच खऱ्या अर्थाने राजकारणाचा मजबुत पाया ठरणार आहे.
आमचा महाराष्ट्र,आमचे कारखाने,आमच्या शैक्षणिक संस्था हाच ध्येयवाद आम्ही सर्वानी आता स्विकारला पाहिजे.
परिवर्तन हाच प्रगतीचा मंत्र आहे.भले भले राजकारणी जेव्हा डबघाईस येतात तेव्हा तेच सांगत असतात भाकरी करपायला लागली की,ती उलटावी लागते घोडा अडला की, तो वळवावा लागतो.हे सांगतात आपण हि समाधानी होतो या एका भावनेवर ते घोडीला घोडा लावुन मोकळे होतात. त्यामागचा मुलमंत्र आम्हाला का समजुन घेतला पाहिजे व नव्या राजकारणाची जुळवाजुळव आम्ही केली पाहिजे. हे वीस ते वीस हे दोन हजार तेवीस फसवे गणित आहे हे समजुन घेतले पाहिजे व चोवीस खरे गणित जुळवले पाहिजे
आण्णां धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता