भावभक्तीची गोडी…

0
30

भावभक्तीची गोडी…

भावभक्तीची गोडी, सदा राहू दे
नामस्मरणात माझे मन गुंतू दे ||धृ||

दीप आरतीत तव रूप लखलखते
धूप सुवासिक मंद गंध दरवळते
ध्यानमंदिरी तुझी छबी दिसू दे
चित्त माझे भक्तीत न्हाऊ दे ||१||

सागर मंथनात अमृत तू दिले
भक्त रक्षण्यास सदा पुढे उभे
शरण तुला मी, कृपा बरसू दे
हरिपाठ गात मी रमू दे ||२||

नरसींहाच्या चरणी तू भक्त झाला
भागवत धर्माचा गूढ तू उलगडला
तुकारामाच्या गाथा उमटू दे
हरिपाठ गात मी नाचू दे ||३||

श्वासांचा प्रवास असे तुझ्या गजरात
देह मिटता राहू दे तव चरणात
मोहाचा फास आता सुटू दे
परमसुखी अंतरी तुला पाहू दे ||४||

भावभक्तीची गोडी, सदा राहू दे
नामस्मरणात माझे मन गुंतू दे ||धृ||

वर्षा ननवरे
इंदापूर
दि.१५/२/२०२५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here