भगवान येशु ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा नाताळचा सण
सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो
— उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नाताळच्या शुभेच्छा
नाताळ सणानिमित्ताने देशवासियांमध्ये एकता, समता,
बंधुता, परोपकार, सहकार्याची भावना वाढीस लागो
— उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नाताळच्या शुभेच्छा
मुंबई, दि. 24 :- “भगवान येशु ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. देशवासियांमध्ये एकता, समता, बंधुता, परोपकार, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनेला नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नाताळनिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, भगवान येशु ख्रिस्तांनी जगाला दया, क्षमा, शांती, परोपकार, मानवकल्याणाची शिकवण दिली. दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना मदत करण्याचा, त्यांची सेवा करण्याचा संदेश दिला. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्यातंच मानवजातीचं कल्याण आहे, हा विचार भगवान येशु ख्रिस्तांनी जगाला दिला. त्यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होत असलेल्या नाताळच्या निमित्ताने मानवकल्याणाचा हाच विचार पुढे नेण्याचा दृढसंकल्प करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाताळनिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात केला आ
दि. 24 डिसेंबर 2023.
माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या
जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई, दि. 24 :- “देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी हे लोकमान्य, लोकप्रिय नेते होते. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाला विकासाच्या वाटेवर पुढे नेण्याचं काम त्यांनी यशस्वीपणे केलं. लोकशाहीत सर्वपक्षीय, सर्वधर्मीयांचा सहभाग महत्वाचा मानणारं, निर्णयप्रक्रियेत सर्वांना सामावून घेणारं त्यांचं नेतृत्वं होतं. देशाच्या राजकारणाला त्यांनी उदारमतवादी, सुसंस्कृत चेहरा दिला. समाजातील सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांतांच्या नागरिकांना आपलेसे वाटणारे अटलबिहारी वाजपेयी हे आदर्श राजकारणी होते. कवीमनाचे, संवेदनशील व्यक्तिमत्वाचे आदरणीय अटलबिहारी वाजपेयी साहेब देशवासियांच्या कायम स्मरणात राहतील. त्यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या विचारांना, कार्याला, स्मृतींना विनम्र अभिवादन…,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यानी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन अभिवादन केले आहे.