बारामती स्पोर्ट्स फाऊंडेननं पुणे ते बारामती Relay Run & Cycling चं नियोजन केलेलं होतं …अफलातून

0
बारामती स्पोर्ट्स फाऊंडेननं पुणे ते बारामती Relay Run & Cycling चं नियोजन केलेलं होतं …अफलातून

बारामती स्पोर्ट्स फाऊंडेननं पुणे ते बारामती Relay Run & Cycling चं नियोजन केलेलं होतं …अफलातून ..!

बारामतीचे ..बहुत पहिले,अभि ..भी ..सायकल रायडर… एकनाथ देशमाने यांच्या शब्दांत रॅलीचे वर्णनं ….!
२० रनर्स आणि ४० सायकल पट्टू सपोर्ट स्टाफसहीत जवळपास १०० जणांचा चमू ही रीले रन आणि सखयकलींग करणार होते.१०० की.मी.ची ही राईड अविस्मरणीय अशीच झाली.शनिवारी बारामतीतून

! याड लागलं रं याड लागलं रं रंगलं तुझ्यात याड लावं रं वास येई दिवसाच कस्तुरीचा ,पाखरू कसं …आभाळ पांघराय लगलं रं , याड लागलं रं याड लागलं रं…..!!

निमित्त होतं आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ६२ व्या वाढदिवसपर ..बारामती स्पोर्ट्स फाऊंडेन ने आयोजन पुणे ते बारामती Relay Run & Cycling चं नियोजन केलेलं होतं …२० रनर्स आणि ४० सायकल पट्टू सपोर्ट स्टाफसहीत जवळपास १०० जणांचा चेमू ही रीले रन आणि सायकलींग करणार होते.१०० की.मी.ची …ते यादगार पल..

बारामती स्पोर्ट्स फाऊंडेननं पुणे ते बारामती Relay Run & Cycling चं नियोजन केलेलं होतं …अफलातून

व ही राईड अविस्मरणीय अशीच झाली..

शनिवारी बारामतीतून पुण्याला हा १००/१२५ जण स्पर्धक …जेव्हा

शिवाजी नगरला इंजीनीयंरींग महाविद्यालयाच्या होस्टेलवर संध्याकाळी ७ ला जाऊन पोहचले तेव्हा ..

तेथील प्राध्यापकांनी आणि कर्मचारी वर्गांनं जेवणाची आणि राहण्याची सोय केली होती.

बारामती स्पोर्टस फाऊंडेशनचे संस्थापक आयर्नमन सतीश ननावरे यांनी याराईडची सगळी सूत्रं यशस्वीरीत्या सांभाळली त्यांचे शतश: आभार ‌.

रविवारी पहाटे ३ लाच शिवाजी नगर सोडून आम्ही सारसबाग गाठली.पुण्याचे

आमदार प्रशांत दादा जगताप राष्ट्रवादी शहराध्यक्ष दत्तात्रय धनकवडे आणि सहकार्यांनी ४ वाजता उपस्थीत राहून Relay Run & Cycling ला हिरवा झेंडा दाखवला आणि सुरू झाली एका आविस्मरणीय पर्वाच्या नांदीची पेरणी.

  • काल बहुतेक सर्व वयोगटातली मंडळी व्यायामाचं महत्वंच हरवुन बसलेली आहेत.

अशा वातावरणांत सुरू झालेली ही””””””” भीमपराक्रमाची””””” दौड आणि सायकल राईड नक्कीच बारामतीकरांना आणि पुणेकरांना व्यायामाशिवाय पर्याय नाही हा संदेश देऊन गेली आहे.

बरोबर पहाटे ४ वा.राईडला सुरुवात केली तीही गणपती आणि शंकराच्या आरतीनं

सर्व मान्यवरांनी दोनशे मी.धावुन आणि पुढील वर्षी कमीत कमी हाडपसर पर्यंत तरी धावायचं वचन दिलं…

शंकरशेठ रोड नं सरळ ५.३० ला हाडपसर गाठलं ….दशरथ जाधव आयर्नमन आम्हाला जोडले गेले….त्यांच्यातला उत्साह त्यांच्या चेहर्यावरूंनच जाणवत होता…थोडसं म्हणजे भेकराईनगरला पोहचतो ना पोहचतो तोच पावसानं जोडीला येवुन जी काही अफलातून साथ दिली ती आविस्मरणीय अशी साथ कुणाचीच लाभली नाही.पावसाला सुरुवात झाली तसा एक नवा जोश नवा उत्साह अंगात वीज सळसळावी तसा आवेश वाढला सर्व धावपट्टू आणि सायलपटटूंच्या आनंदाला एखाद्या सागराला भरतं यावा तसा द्वीगुणीत झाला.दिवेघाटाच्या पायथ्याशी एक दहापंधरा मिनिटांचा ब्रेक घेतला.सगळे फ्रेश होवून एका नव्या दमानं सुरूवात करायला सरसावले.मस्त वरून पाऊस आणि आतून घामाच्या धारा हे combination काही निराळंच होतं.

अर्धा तास घाट चढणीत गेला सोबतीला पावसाची साथ लाजबाब सायकलपट्टू आणि लाजबाब धावपट्टूंचा आविष्कार रस्त्यांतील येणारा- जाणारा प्रत्येक जण कुतूहलानं पाहात तरी होता आणि काही हौशी मंडळीआपल्या मोबाईलमध्ये ही राईड टीपत होते.घाटमाथ्यावर दशरथ जाधव आयर्नमन यांनी सगळ्यांची नाष्ट्याची सोय केली होती….इतक्यांत बारामती रनर ग्रुपच्या सदस्यांनी बरोबर येवून जवळपास २५ की.मी.ची दौड केली.पी.एन.देवकाते,निलेश ,गादीया,वरद देवकाते ,वकील,यांनी दिलेली प्रोत्साहनाची पावती आम्ही कधीच विसरू शकत नाही.सासवडला आल्यावर चहाकौफीची आणि कोल्ड्रींक्सची सोय संदीप राऊत यांच्या सहकार्यांनी केलेली होती.सासवड सोडून पुढील राईडला सुरूवात करताना एक एक की.मी.जसजसं पूर्ण करत जात होतो तसतसा जोश आणखी वाढत जात होता.जेजूरीला झालेला सर्वांचा सत्कार आणि पोहे उपीटाचा नाष्टा बरंच काही सांगुन गेला.जेजूरी सोडता सोडता १.३० वाजून गेला होता.

मोरगावच्या आलीकडं गेस्ट हाऊसला एक पंधरा मिनिटांचा ब्रेक घेतला.तिथं केळी,चीक्की पाणी आणि इतर विधी उरकला.मंदीरांत गणपती बाप्पाला वंदन करून बारामती चौकात विश्वास ( नाना) देवकाते मा.जिल्हा परीषद आध्यक्ष आणि आजून दोन मोरगावच्या नानांनी कांदाभजीची सोय केलेली होती.यथेच्छ कांदाभजीवर ताव मारून ही दौड आणि सायकल राईड ला पुन्हा एकदा नव्या दमानं सुरूवात केलेली.जळगावला ग्रामस्थांनी सगळ्या सायकल स्वारांच आणि धावपट्टूंच स्वागत गुलाब पुष्प देऊन केलं.आता फक्त १५ की.मी. उंच अंतर पार करायचं बाकी होतं.मेडद सोडलं आणि शरयु टोयोटाचे नेवसे बंधूंनी दिलेला वेफर्स आणि कोल्ड्रींक्सचा आस्वाद सोबतीला डीजेवर धरलेला ठेका सायकल पट्टू आणि धावपट्टुंनी अफलातून डान्स करुन सादाला प्रतीसाद दिला.

मग सरळ खंडोबा नगर मधून कसबा गुणवडी चौकांत गालींदे परीवारांनं फटाकड्यांच्या आतषबाजीनं आणि गुलाबपुष्पांनी फ्रुटी देऊन केलेलं स्वागत अविस्मरणीय असंच होतं.गांधी चौकांत पोलीस आणि होमगार्ड यांनी केलेला फुलांचा वर्षाव सगळा धावपट्टूंचा आणि सायकल पट्टूंचा थकवा,शिणवठा पळवणारा ठरला.निलेश मुथा पहाडे परीवारांनं केलेला सत्कार वाखाणण्यासारखा होता.भिगवण चौकात कै.कैलास सोनवणे मित्रमंडळानं केलेला फटाक्यांच्या आतषबाजीतला सत्कार सोहळा आविस्मरणीय असाच होता.शिवाजी उद्यान येथे झालेला सांगता समारंभ बारामती स्पोर्टस फाऊंडेशनचे आध्यक्ष सतीश ननावरेंना सुद्धा गहिवरून आलं दाटलेले आश्रु मोकळे झाले.नंतर डेंगळे गार्डन मध्ये डेंगळेंनी केलेलेली जेवणाची सोय त्याचा आस्वाद घेतला आणि प्रत्येकांनं निरोप दीला .

Leave A Reply

Please enter your comment!
Please enter your name here