विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाचे संगणक विभागप्रमुख डॉ. चैतन्य कुलकर्णी यांना भारत उत्कृष्ट राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार अंतर्गत प्रतिष्ठित आचार्य पुरस्कार प्रदान.
२१ एप्रिल २०२४ रोजी आंध्र युनिव्हर्सिटी, विशाखापट्टणम येथे आयोजित भारत एक्सलन्स नॅशनल एज्युकेशन अवॉर्ड या कार्यक्रमात डॉ. चैतन्य कुलकर्णी यांना आचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी डॉ. बुद्ध चंद्रशेखर, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), नवी दिल्लीचे मुख्य समन्वय अधिकारी, डॉ. वाय. व्ही. रेडी, आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. भारत उत्कृष्टता राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार सोहळा उत्कृष्टता, नाविन्यपूर्णता आणि समर्पण प्रदर्शित करणाऱ्या शिक्षक आणि संस्थांच्या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते. हा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्टता आणि समर्पणाचे प्रतीक मनाला जातो. ज्यांनी त्यांच्या संबंधित क्षेत्रामध्ये ज्ञान आणि शिक्षणाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे अशा व्यक्तींनाच या पुरस्काराने सन्मानित केले जाते. या समारंभात बोलताना मा. डॉ. बुद्ध चंद्रशेखर, डॉ. वाय.व्ही. रेडी, आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू यांनी डॉ.चैतन्य कुलकर्णी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि शैक्षणिक क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल प्रशंसा केली. हा पुरस्कार मिळविण्याकामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर यांचे मार्गदर्शन लाभले.