बारामती लोकसभा 2024 निवडणूक महाभारताचे पुनरावृत्ती…!

0
97

बारामती निवडणूक 2024 महाभारताचे पुनरावृत्ती…

भावनगरी संपादक संतोष शिंदे बारामती = 9822730108

रणसंग्राम रणसंग्राम निवडणुकीचा रणसंग्राम महाभारत निवडणूक 2024 बारामती लोकसभा ननंद विरूद्ध भावजय रंणागनाथ उतरणार जवळपास निश्चित झाले आहे.

मात्र बारामतीची मतदान करणारी जनता ही अर्जुनाच्या भूमिकेत दिसून येत आहे.
आजवर बारामतीच्या जनतेने संपूर्ण देशावर ज्याची राजकीय दहशत आदरयुक्त राजकीय दरारा तर महाराष्ट्राची राजकीय पंढरी म्हणून ज्याची ख्याती प्राप्त असलेल्या बारामतीत यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत दोन्ही आपलेच परंतु एकाला निवडून द्यायचे आहे.

मात्र ते कोणाला आपले मतदान करायचे प्रश्न कठीण आहे.
निर्णय तो मतदाराला बारामतीला बारामतीकरांना घ्यायची वेळ आलेली आहे काळ उभा टाकला आहे बारामती लोकसभा निवडणूक 2024 सुप्रिया सुळे विरुद्ध पवार अशी लढत होणार हे जवळपास निश्चित झाले असून प्रचार फेरी जोरदार होत आहेत ननंद व भावजयी प्रचार फेरीला मेळाव्यांना भेटीगाठींना प्रतिसाद ही मिळत आहेत परंतु जनतेच्या मनात अंतर्मनात अजूनही अर्जुनाप्रमाणे तो एकच प्रश्न निर्माण होत आहे हे दोन्ही उमेदवार आपलेच आहेत.!

आजवरची मोहमाया जाळ्यात पवार कुटुंब आणि बारामतीकर असे घनिष्ठ नाते हितसंबंध राहिलेले आहेत .

परंतु नियतीचा बदल हा अटळ आहे व बदल झाला पाहिजे जनता निर्णय घेईल मात्र तो संभ्रम जनतेच्या मनात आहे की कोणाला झुकते माप द्यायचे गावात निर्णय होण्यासाठी सरपंच पोलीस पाटील पाहुणे गावकरी या प्रमुखात विचार होऊन निर्णय दिला जातो तसाच प्रसंग बारामती करावं येऊन ठेपलेला आहे दोन्हीपैकी एक निवडून येणार आहेत दोन्ही आपलेच उमेदवार असतील काळानुरूप बदल झालाच तो स्वीकारणे जनतेला क्रम प्राप्त असे आहे एकीकडे वडील किचन नातं एकीकडे पालकत्त्वाची भूमिका दोन्हींना अंतर देना मनाला तर पटत नाही जड अंतर्मनातून विचार सकारात्मक दृष्टी सुज्ञ बारामतीकर निर्णयावर पोहोचतील तेही शेवटी…!

आजची पोपटपंची नको… यापुढे महाभारत घडणार हेही आटळ आहे राजकीय डावपेच पुढे केव्हा सुटतील हेही बारामतीकरांनी पाहणे अपेक्षित आहे…!

सुप्रिया सुळे /सुनेत्रा पवार

लढाई होणार ननंद आणि भावजयचीच… हे निश्चित हे झालेले आहे आज विचार केला तर दिल्लीत खासदार म्हणून बारामतीच्या खासदार सौ सुप्रिया सुळे यांना तीन वेळा खासदार रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या त्या एकुलत्या एक लेक आहेत बारामतीत व तालुक्यात आजवर त्यांनी अभ्यासलेले राजकारण केलेले दिसून येते मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार रोखठोक वकृत्व भाषाशैली निर्भिडतेने जनतेची विकास कामे केलेली आहेत तर सुनेत्रा पवार यांनीही अजितदादा यांच्या पाठीमागे खंबीर साथ करत जनतेत कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे तेही विविध संस्थांच्या कामाच्या माध्यमातून तर जन मानसात मिसळत अजित पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत विकास कामांना गती बारामती त एन्व्हायरमेंटल फोरमच्या माध्यमातून , ग्रामपंचायत काटेवाडी येथून सुरुवात राजकीय जीवनाची वाटचाल करत विकास कामांना गती बारामती त देण्याचे तसेच सामाजिक दायित्व कार्य कर्तुत्व पार पाडलेले आहे विविध संस्थांच्या माध्यमातून त्या जनमानसात सहज मिसळतात हे त्यांचे गुण आहेत तर मिळालेल्या संधीचे सोने कसे करता येईल यासाठी त्यांची आत्मिक तळमळ महत्त्वकांक्षा त्यांच्यात आजमितीस स्पष्ट दिसून येतात. तर अजित पवार यांचे त्यांच्या पाठीशी मोठे विकासात्मक वलय निर्मिती , आज वरच्या अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या कार्याची जनता दखल घेईल आशयाची चर्चाही होत आहेत बारामती .
दुसरीकडे आदर्श बापाची लेक नसून सर्व बारामतीकरांनी आपली लेक मांनली तर आजवर त्या तीन वेळा खासदार ही झालेल्या आहेत आता पुन्हा निवडणुकीच्या रणांगणात उभ्या राहणार आहेत वडिलांचे आजवरचे आशीर्वाद प्रमाणे बारामतीकरांचेही त्यांना आशीर्वाद प्राप्त आहे सहानुभूती पर विचार मात्र होईल अशी आशयाची चर्चा रंगतदार होत आहेत .

साहेबांना शेवटची संधी द्यायचीच असा ठाम विश्वास जुने जाणते लोक एकांतात बोलूनही दाखवतात .

मात्र पुढे जड जाईल म्हणून सावधानता जनतेतून कमालीची सतर्कता गुप्तगुण पाळली जात आहे.

राष्ट्रवादीचे चिन्ह व पक्ष घेतला असा आरोप ही होत आहे.तर अजित पवार यांनी भाजपची हात मिळवणे करून सत्तेत गेलेले आहेत .

बारामतीचे हित ही जनतेला दिसून येते आहे.

तर दुसरीकडे सहानुभूतीची लाट ही कायम आहे.

लढत चुरशीची ठरणार त्यामुळे बारकाईने विचार केल्यावर लक्षात येईल की महाभारतातील अर्जुनाप्रमाणे बारामतीतील जनतेच्या मनातही भावनिक ,तर अंतर्मुख होण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

राजकीय रणांगणाचे वातावरण निर्मितीही स्पष्ट दिसून येत आहे.

रणांगणात शब्दयुद्धप्रमानेच राजकीय मतभेद व राजकीय वातावरण निर्मिती स्पष्ट दिसून आलेली असून

बारामती लोकसभा 2024 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीगाठींसह संपर्काचा धडाका लावला आहे.

यंदाची निवडणूक ही थेट शरद पवार विरुध्द अजित पवार अशीच होणार असल्याने दोघांनीही तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे.

अजित पवार काल आणि आज दोन दिवस बारामतीतच असून त्यांनी विविध घटकांशी चर्चा, सभा, मेळावे, सांत्वनभेटींगटि सुरूच आहेत.

शरद पवार यांनीही विविध मान्यवरांच्या गाठीभेटी घेण्यासह संपर्कावर भर दिलाय…! तर

गेल्या काही दिवसांपर्यंत बारामतीत निवडणुकीचे वातावरणच वाटत नव्हते, आता मात्र दोन्ही बाजूंनी जोर लावण्यात येत असून खुद्द शरद पवार व अजित पवारच मैदानात उतरलेले असल्याने बारामतीच्या निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 19 एप्रिल हा असल्याने आदल्या दिवशी म्हणजे 18 एप्रिल रोजी दोन्ही उमेदवार आपापले अर्ज दाखल करणार आहेत.

दरम्यान सुनंदा पवार व अजित पवार यांनीही अर्ज विकत घेतले असून सुप्रिया सुळे यांच्यासाठी सुनंदा पवार व सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार डमी फॉर्म भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान सुप्रिया सुळे यांचा बारामती विधानसभा मतदारसंघाचा प्रचाराचा प्रारंभ शुक्रवारी 18 ला तालुक्यातील श्री क्षेत्र कण्हेरी येथून होणार आहे. पवार कुटुंबियांच्या प्रत्येक निवडणुकीचा बारामतीतील नारळ श्री क्षेत्र कण्हेरी येथूनच करण्याची परंपरा आहे, सुप्रिया सुळे यांनी यंदाही ही परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here