बारामती येथील सहाय्यक प्राध्यापक व्यंकटेश रामपूरकर यांना आयआयटी मुंबईचा पुरस्कार

0
148

प्रतिनिधी:BhavnagaRi

विद्या प्रतिष्ठानचे कमल नयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय बारामती येथील सहाय्यक प्राध्यापक व्यंकटेश रामपूरकर यांना आयआयटी मुंबईचा पुरस्कार.
भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी मुंबई) मार्फत घेण्यात येणाऱ्या स्पोकन टुटोरियल सर्टिफिकेशन अभ्यासक्रमाचे महाविद्यालय गेल्या काही वर्षात अत्यंत योग्य पद्धतीने नियोजन करून जवळ जवळ ३००० पेक्षा जास्त सर्टिफिकेशन विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आल्याबद्दल प्रा. व्यंकटेश रामपूरकर यांना “स्पोकन टुटोरियल मास्टर” पुरस्काराने आयआयटी मुंबईकडून सन्मानित करण्यात आले. या वेळी विद्या प्रतिष्ठानच्या माजी विद्यार्थींनी मानसी परदेसी व अक्षदा पाटील यांना स्टार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या अभ्यासक्रमाचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाला असून हा अभ्यासक्रम शिकल्यामुळे त्यांना नामांकित कंपन्यानंमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. प्राचार्य डॉ. रा. स. बिचकर विभागप्रमुख डॉ. चैतन्य कुलकर्णी, प्लेसमेंट अधिकारी विशाल कोरे यांनी प्रा. रामपूरकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
हा अभ्यासक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी प्राचार्य डॉ. रा. स. बिचकर यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच संस्थेचे विश्वस्थ सुनेत्रा पवार, खजिनदार श्री युगेंद्र पवार, उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे व सचिव अॅड. नीलिमा गुजर, डॉ. श्री. राजीव शहा, श्री. मंदार सिकची, रजिस्टार कर्नल. श्री. श्रीश कंभोज यांनी प्रा. रामपूरकर व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here