बारामती येथील डॉ. हाफिज शेख यांना पीएच.डी. पदवी प्रदान….

0
61

विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथील डॉ. हाफिज शेख यांना पीएच.डी. पदवी प्रदान
विद्या प्रतिष्ठानचे  कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे विद्युत अभियांत्रिकी शाखेत सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. हाफिज शेख यांना 28 जून 2024 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग मध्ये पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.  ही पीएचडी मिळवण्या कामी त्यांना डॉ. नीलिमा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. कॉम्पुटेशनल अनालयसिस ऑफ ऑप्टिमायझेशन टूल्स यूज्ड फॉर कंट्रोलिंग वॉटर लेवल इन मिमो सिस्टिम हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. त्यांच्या संशोधनादरम्यान त्यांनी 5 आंतरराष्ट्रीय परिषद पेपर, 2 आंतरराष्ट्रीय जर्नल पेपर आणि 1 भारतीय पेटंट त्यांच्या नावावर प्रकाशित केले. त्यांच्या संशोधन कार्यासाठी डॉ. मयुरेश बक्षी आणि डॉ. पी. बी. करंदीकर यांनी तज्ञ म्हणून काम केले. डॉ. हाफिज शेख यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. श्री. आर. एस. बिचकर, विद्याप्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त मंडळ तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग या सर्वानी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here