विद्याप्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथील डॉ. तृप्ती वसंतराव भंडारे यांना पीएचडी प्राप्त
विद्याप्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे संगणक अभियांत्रिकी शाखेतील सहायक प्रा. डॉ. तृप्ती भंडारे यांनी अलायन्स युनिव्हर्सिटी, बंगलोर येथून संगणकीय बुद्धिमत्तेद्वारे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचे कार्यक्षम निदान आणि विश्लेषण या विषयात पीएचडी प्राप्त केली आहे. डॉ. तृप्ती भंडारे यांनी वेब ऑफ सायन्स आणि स्कोपसमध्ये अनुक्रमित केलेले तीन शोधनिबंध प्रकाशित केले. तसेच सीआरसी प्रेस, टेलर आणि फ्रान्सिस पब्लिकेशनमधील एक पुस्तक अध्याय त्याच बरोबर विकसित प्रणालीवर दोन कॉपीराइट नोंदणीकृत केले आहेत. डॉ. सेलवरानी आणि डॉ. चेतन शेळके हे त्यांचे पीएचडीचे मार्गदर्शक होते. डॉ. तृप्ती भंडारे या महाविद्यालयात गेली काही वर्ष सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पीएचडी मिळविण्याकामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, संगणक शाखेचे विभाग प्रमुख डॉ. सी. एस. कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त मंडळ यांनी डॉ. तृप्ती भंडारे यांचे अभिनंदन केले.