बारामती मध्ये मंत्रोच्चारसह सलग १२ तास अखंड सूर्यनमस्काराचा विक्रम

0
206

बारामती मध्ये मंत्रोच्चारसह सलग १२ तास अखंड सूर्यनमस्काराचा विक्रम संपन्न : बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सदस्य अजिंक्य साळी यांचा विक्रम

ता.29 जानेवारी (प्रतिनिधी)
२८ जानेवारी जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त तसेच २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शाहिद जवानांना अभिवादन करण्यासाठी , बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सदस्य अजिंक्य साळी यांनी वैष्णवी ग्राफिक्स , बारामती येथे सूर्योदय ते सूर्यास्त असे सलग १२ तास मंत्रोच्चारसह सूर्यनमस्कार घालण्याचा अनोखा विक्रम केला .
आरोग्यमय जीवनासाठी आपल्या आपल्या प्राचीन भारतीय संस्कृती मध्ये सूर्यनमस्कारास ‘ सर्वांगसुंदर व्यायाम ‘ असे संबोधण्यात आले आहे . समाजात सूर्यनमस्काराबद्दल जागृती होण्यासाठी तथा प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहीद जवानांना अभिवादन करण्यासाठी हा विक्रम केल्याचे अजिंक्य साळी यांनी सांगितले .
अजिंक्य साळी हे जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत . त्यांना व्यायामाची आवड असून , आरोग्यमय विद्यार्थी घडावे यासाठी ते प्रयत्नशील असतात .
या उपक्रमात बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून चि. अद्वैत भोसले ,कु.अनुष्का राऊत,कु.वैष्णवी ननवरे श्री.सचिन बर्गे यांनी , अजिंक्य यांच्या बरोबर सूर्यनमस्कार 1708 घातले आणि अजिंक्य यांचा उत्साह वाढविला .
सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून , अजिंक्य यांचा अनोखा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करणार असल्याची महिती अजिंक्यचे मार्गदर्शक तसेच बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष आयर्नमॅन सतिश ननवरे यांनी दिली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here