बारामती बाजार समितीचे जळोची भाजी मार्केट दिपावळी सणामुळे शुक्रवारी चालु राहणार

0
18

बारामती बाजार समितीचे जळोची भाजी मार्केट दिपावळी सणामुळे शुक्रवारी चालु राहणार

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे जळोची उपबाजार येथे फळे व भाजीपाल्याचे लिलाव दररोज असतात मात्र दर शुक्रवारी मार्केट बंद असते. दिवाळी सण सुरू असल्याने फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी असोसिएशन यांच्या विनंती नुसार शुक्रवार दि. १/११/२०२४ रोजी जळोची मार्केट सुरू ठेवले आहे आणि रविवार दि. ३/११/२०२४ रोजी भाऊबीज असल्याने मार्केट बंद राहणार आहे. या बदलाची नोंद सर्व शेतकरी, आडते, व्यापारी व बाजार घटकांनी घ्यावी व शेतक-यांनी आपला शेतमाल शुक्रवारी विक्रीस आणावा असे आवाहन समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी केले आहे.
समितीने जळोची उपबाजार येथे फळे व भाजीपाला विक्री व्यवस्थेसाठी भव्य सेलहॉलची उभारणी केली असल्याने शेतमालाचे ऊन, पाऊस या पासुन संरक्षण होत आहे. शेतमालाची खरेदी विक्री वेळेत होऊन त्याचा फायदा शेतक-यांना होत आहे. आवारात फळे व भाजीपाला तसेच झेंडु, शेवंती इत्यादी फुलांचे लिलाव उघड पद्धतीने होत असतात. त्यामुळे शेतक-यांनी आपला शेतमाल चांगल्या पॅकींग व ग्रेडींग करून आणावा समिती तर्फे अशी विनंती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here