बारामतीतील जनतेला बारामती नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना जाहीर आवाहन….की
बारामती नागरिकांना कळविण्यात येते की नीरा डावा कालवा काही दिवसापासून बंद असल्याकारणाने…
कळविण्यात येते की, नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाले असून उपलब्ध पाणीसाठा मर्यादीत असल्याने पर्यायाने पाणी पुरवठा एक दिवसाआड बंद ठेवावा लागणार आहे.
त्याचे नियोजन खालील प्रमाणे गुरुवार दि.27/6/2024 रोजी संपूर्ण बारामती शहर व ग्रामीण भागात पाणी पुरवठा होईल व दिनांक शुक्रवार दिनांक 28/06/2024 रोजी पाणीपुरवठा होणार नाही अशाप्रकारे निरा डावा कालव्याचे पुढील आवर्तन मिळेपर्यत एक दिवसाआड पाणी पुरवठा होईल याची सर्व नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी.
तसेच पाण्याचा जपून वापर करावा व नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान बारामती नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्या वतीने कळविण्यात आले आहे …!