प्रतिनिधी:
बारामती :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. शरद पवार साहेब यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्तीगीर संघ यांच्या वतीने शारदा प्रांगण येथे सोमवार दि १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता
आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केल्याची माहिती कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष श्री युगेंद्र पवार यांनी दिली प्रेक्षनीय कुस्ती मैदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा खा श्री शरद पवार उपस्थित राहणार असून कुस्ती आखाड्याचे उदघाटन उद्योगपती मा श्री श्रीनिवास बापू पवार यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. देशात गाजत असलेला महाराष्ट्राचा सुपुत्र नामांकित मल्ल पै सिकंदर शेख व इराणचा आंतरराष्ट्रीय मल्ल पै अली इराणी यांच्यात प्रथम क्रमांकची ५ लाख रुइनामाची निकाली कुस्ती होणार असून ३ लाख रुइनामाच्या पै शैलेश शेळके वि पै माऊली कोकाटे, मुंबई महापौर केसरी भारत मदने वि पै गणेश जगताप, महाराष्ट्र केसरी पै बालारफिक शेख वि महाराष्ट्र केसरी पै हर्षद सदगीर असे विख्यात मल्ल एकमेकांना भिडणार आहेत