HomeUncategorizedबारामती तालुक्यातील तरडोली गावात दुग्ध व्यवसायास चालना मिळणे करिता आमरण उपोषण..आज शेतकरी...

बारामती तालुक्यातील तरडोली गावात दुग्ध व्यवसायास चालना मिळणे करिता आमरण उपोषण..आज शेतकरी दूध व्यवसाय रास्ता रोको…!

बारामती तालुक्यातील तरडोली गावात दुग्ध व्यवसायास चालना मिळणे करिता आमरण उपोषण..आज शेतकरी दूध व्यवसाय रास्ता रोको…!

प्रतिनिधी;-
दुग्ध व्यवसायास चालना मिळणेसाठी खालील विविध मागण्या पूर्ण होणे गरजेचे आहे. शेतकरी हाच दुग्ध व्यावसाईक असून शेती वाचवण्यासाठी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय चालू केला परंतु या व्यवसायात हि शेतकऱ्याचा तोटा होत आहे.याचे कारण सरकारी दुग्ध विषयक असणारे अपुरे धोरण आहे. म्हणू या व्यवसायाचा विकास होण्याकरिता आम्ही सर्व शेतकरी व दुग्ध व्यावसाईक आपल्या मार्फत सरकारकडे खालील प्रमाणे मागण्या करत आहोत. या मागण्याचा विचार लवकरात लवकर करण्यात आला नाही तर दि.०१/१०/२०२३ रोजी तरडोली ग्रामपंचायत कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषणा द्वारे आंदोलन करणार आहोत. याची दक्षता घेण्यात यावी हि विनंती. आमच्या विविध मागण्या खालील प्रमाणे:

१) दुधाला प्रति लिटर ४० रु हमखास दर मिळावा.

२) दुष्काळ सदृश भागात चारा डेपो उपलब्ध करणे.

३) तरडोली गावातील तलावात पाणी सोडणे बाबत.

४) सध्यस्थितीत नागरिकांस व जनावरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.

५) दुधाचा रिटर्न रेट कमी करणेत यावा. ६) प्रत्येक गावास स्वतंत्र शासकीय पशुवैद्यकीय डॉक्टर उपलब्ध करून द्यावा.

७) १० हजार जनावरांची संख्या असणाऱ्या भागात शासकीय पशुवैद्यकीय लॅब चालू करणेत यावी. (उदा. रक्त, लगवी, एक्सरे इ. तपासणी)

८) दुग्ध व्यवसायासाठी दुग्ध विकास सोसायटी प्राप्त होणे. (उदा. दुग्ध व्यवसायास लागणाऱ्या भांडवला साठी )

(९) बारामती तालुक्यातील ५३ गावे हि कायम दुष्काळी पट्ट्यात येत असून या गावांस कायमस्वरूपी शेतीस पूरक पाणीपुरवठा योजना तयार करून आमलात आणणे.

१०) २०१८-१९ चा दुष्काळ, लगतच कोरोनाची साथ या सर्व परस्थितीमुळे दुग्ध व्यवसाय तोट्यात गेल्याने या व्यवसायास घेतलेल्या कर्जाची परतफेड होवू शकली नाही अशा कर्जदारास व्यवसाय पुन्हा उभारणीकरिता व्याज माफी व कर्ज मुदतवाढ मिळून देणे .

११) कोरोना काळातील लॉकडाऊन मध्ये दुध संघांनी केलेल्या दुधाच्या खरेदी-विक्रीचे ऑडिट तपासणी करण्यात यावी.

१२) दुग्ध संकलन करणाऱ्या संस्थांनी दुग्ध व्यावसाईकांना दमदाटी करून फसवणूक केली आहे. अशा संस्थांवर कार्यवाही करून त्यांचा दुध संकलन परवाना रद्द करण्यात यावा.
कर्जदारास व्यवसाय पुन्हा उभारणीकरिता व्याज माफी व कर्ज मुदतवाढ मिळून देणे . अशा प्रकारची मागणी समस्त दूध व्यवसाय शेतकरी श्री सागर पंडित जाधव राहणार तरडोली व समस्त दूध व्यवसाय शेतकरी यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी बारामती पंचायत समितीला निवेनाद्वारे केलेली आहे. तर आज मोठ्या प्रमाणात बारामती मोरगाव रस्ता तरडोली येथे वरील मागण्यांकरिता रस्ता रोको ही करण्यात आलेला दिसून आलेला होता…

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on